प्रशासकीय इमारतीचे आज लोकार्पण
By Admin | Updated: October 6, 2016 00:23 IST2016-10-06T00:23:35+5:302016-10-06T00:23:35+5:30
सहा कोटी रुपये खर्च करून येथे बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गुरूवार ६ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

प्रशासकीय इमारतीचे आज लोकार्पण
महागाव : सहा कोटी रुपये खर्च करून येथे बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गुरूवार ६ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल.
प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हापरिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, खासदार राजीव सातव, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक सिंगला, नगराध्यक्ष सुनील नरवाडे, नगरपरिषद उपाध्यक्ष उदय नरवाडे, पंचायत समिती सभापती गोदावरी जाधव, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता एस.डी. धोत्रे, उपविभागीय बांधकाम अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, प्रभारी तहसीलदार एन.जे. इसाळकर, जे.यु. डहाणे, उपस्थित राहणार आहे.
माजी आमदार विजय खडसे यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा होत आहे. महागाव तहसील आणि अन्य शासकीय कार्यालये एकाच इमारतीमध्ये येणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. (शहर प्रतिनिधी)