बारावीच्या ३५ हजार विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा
By Admin | Updated: February 28, 2017 01:22 IST2017-02-28T01:22:27+5:302017-02-28T01:22:27+5:30
मंगळवारपासून बारावीच्या शालांत माध्यमिक परीक्षेला प्रारंभ होत आहे.

बारावीच्या ३५ हजार विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा
यवतमाळ : मंगळवारपासून बारावीच्या शालांत माध्यमिक परीक्षेला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील १०४ केंद्रावरून ३५ हजार ५०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे.
२८ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरीता १०४ केंद्राची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी ३३ हजार ४७९ नियमित विद्यार्थी आणि २०३३ रिपीटर्स विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.
परीक्षा काळात कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी १०४ भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच बैठे पथकही कारवाई करणार आहे. परीक्षा दरम्यान केंद्राच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यास ब्ांदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात जथ्याने फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी शिक्षण विभागासोबतच जिल्हा प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)