एज्युफेस्टमध्ये आज शिव खेरा

By Admin | Updated: December 7, 2015 06:15 IST2015-12-07T06:15:18+5:302015-12-07T06:15:18+5:30

रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मीडटाऊनतर्फे आयोजित रोटरी एज्युफेस्टमध्ये सोमवार ७ डिसेंबरला सुप्रसिद्ध विचारवंत,

Today Shiva Khera in Azfest | एज्युफेस्टमध्ये आज शिव खेरा

एज्युफेस्टमध्ये आज शिव खेरा

यवतमाळ : रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मीडटाऊनतर्फे आयोजित रोटरी एज्युफेस्टमध्ये सोमवार ७ डिसेंबरला सुप्रसिद्ध विचारवंत, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, प्रखर वक्ते शिव खेरा मार्गदर्शन करणार आहेत.
रोटरी एज्युफेस्टमध्ये स्थानिक पोस्टल ग्राऊंडवर सायंकाळी ६ वाजता शिव खेरा यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होईल. ते ‘जीत आपकी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व बेरोजगारीशी झुंजणाऱ्या लाखो तरुणांना त्यांच्या विचारातून प्रेरणा मिळालेली आहे. यानिमित्ताने शिव खेरा यांचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्याची संधी जिल्हावासीयांना मिळणार आहे.
स्व. हिराचंद रतनचंद मुणोत ट्रस्टव्दारे प्रायोजित या मार्गदर्शन शिबिराचा लाभ शहरातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, पालकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष नीलेश धुमे, हिराचंद रतनचंद मुणोत ट्रस्टचे सचिव रमेश मुणोत यांनी केले आहे. यवतमाळ शहरात पहिल्यांदाच शिव खेरा यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दोन भव्य एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहे. अत्याधुनिक साऊंडची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरी सदस्य परिश्रम घेत आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Today Shiva Khera in Azfest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.