शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

यवतमाळात आज पहिल्यांदाच देशपातळीवरील नीट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 5:00 AM

केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय असे दोन केंद्र देण्यात आले. रविवारी १३ सप्टेंबर रोजी येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत परीक्षा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय प्रवेश । ‘जेडीआयईटी’सह शहरात दोन परीक्षा केंद्र सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली देशपातळीवरील नीट परीक्षा यंदा पहिल्यांदाच यवतमाळ शहरातही होत आहे. येथे दोन परीक्षा केंद्र असून तेथे ८४० विद्यार्थी पेपर देणार आहे.केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय असे दोन केंद्र देण्यात आले. रविवारी १३ सप्टेंबर रोजी येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत परीक्षा घेतली जाणार आहे.नॅशनल टेस्टिंग एजंसीद्वारे ही नॅशनल एन्टरन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट (नीट) घेतली जात आहे. रविवारी सकाळी दुपारी २ ते ५ या वेळात १८० प्रश्नांसह ७२० गुणांची परीक्षा होणार आहे. यात जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या केंद्रावर ४८० तर दुसऱ्या केंद्रातून ३६० विद्यार्थी बसणार आहेत.कोविडच्या पार्श्वभूमीवर एनटीएच्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्याचे केंद्राधिकारी डॉ. विवेक गंधेवार यांनी सांगितले. जगदंबा अभियांत्रिकीतही परीक्षेसाठी सज्जता असल्याचे केंद्राधिकारी डॉ. विजय नेवे यांनी सांगितले.पेपरच्या तीन तास आधी विद्यार्थ्यांना ‘एन्ट्री’कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी या परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची एकाच वेळी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी २ वाजता सुरू होणाºया पेपरसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजतापासूनच एन्ट्री दिली जाणार आहे. मात्र त्यातही १२०-१२० विद्यार्थ्यांचे चार स्लॉट पाडण्यात आले असून कोणी किती वाजता यावे याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद आहे.संसर्ग टाळण्यासाठी ‘एक्झिट प्लॅन’पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची बाहेर निघण्यासाठी गर्दी होऊ नये याकरिता जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘एक्झिट प्लॅन’ केला आहे. यात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कोणत्या मार्गाने जावे हे निश्चित आहे. त्यांना मार्ग दाखवित गेटपर्यंत नेण्यासाठी कर्मचारी दिमतीला असतील. शिवाय गेटवर ध्वनीक्षेपकाद्वारे याबाबत उद्घोषणा केली जाणार आहे.सुरक्षित वर्ग रचनाविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्गरचना करण्यात आली आहे. यावेळी एका वर्गात फक्त बारा विद्यार्थी बसविले जाणार असून एका बाकावर एकच विद्यार्थी असेल. दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार आहे. एका वर्गात दोन इन्व्हीजीलेटर असतील. वर्गात येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क पुरविले जाणार आहे. तसेच नोंदणीची प्रक्रियाही ‘टचलेस’ राहणार आहे.कोविडची स्थिती बघता पालकांनी सहकार्य करावे. सूचनांचे पालन करून ठरलेल्या वेळीच विद्यार्थ्यांना केंद्रावर आणावे व विद्यार्थ्यांना सोडून लगेच परत जावे. केंद्राबाहेर घुटमळत राहू नये. त्यामुळे गर्दी-गोंधळ होणार नाही.- डॉ. विवेक गंधेवार, केंद्राधिकारी, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ

टॅग्स :JDIETजेडीआयईटीexamपरीक्षा