आज पालिका उपाध्यक्षांची निवड
By Admin | Updated: January 2, 2017 00:24 IST2017-01-02T00:24:01+5:302017-01-02T00:24:01+5:30
वणी आणि यवतमाळ नगरपरिषदेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेतून सोमवार सकाळी ११ वाजता केली जाणार आहे.

आज पालिका उपाध्यक्षांची निवड
वणी, यवतमाळात सभा : स्वीकृत सदस्यही ठरविले जाणार
यवतमाळ : वणी आणि यवतमाळ नगरपरिषदेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेतून सोमवार सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. स्वीकृत सदस्यपदी कुणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता आहे.
यवतमाळ नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी नगराध्यक्ष शिवसेनेचे आहे. येथील स्वीकृत सदस्यांच्या पाच जागेसाठी भाजप आणि काँग्रेसकडून ११ इच्छुकांनी नामाकंन दाखल केले आहे. शिवाय भाजपा, बसपा आणि अपक्ष नगरसेवकांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. आता पालिका उपाध्यक्ष हा पालकमंत्री मदन येरावार यांच्या मर्जीतील होणार आहे. तर वणी नगरपरिषदेचा उपाध्यक्ष हा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या आशीर्वादानेच ठरणार आहे. तसेच येथे भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने स्वीकृतच्या तीन्ही जागेवर भाजपा सदस्यांचीच वर्णी लागणार आहे. निवडणूकीनंतर तब्बल महिन्या भरांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रत्यक्ष पालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)