जिल्हा परिषद पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले

By Admin | Updated: May 31, 2015 02:18 IST2015-05-31T02:18:04+5:302015-05-31T02:18:04+5:30

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले यांची शनिवारी अविरोध निवड झाली.

Tired of Harsha as the secretary of the Zilla Parishad Credit Society | जिल्हा परिषद पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले

जिल्हा परिषद पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले

यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी हर्षा टाले यांची शनिवारी अविरोध निवड झाली. त्यांच्या रुपाने या संस्थेला ५० वर्षात पहिल्यांदाच महिला सचिव मिळाल्या आहेत. त्या दारव्हा पंचायत समितीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
पतसंस्थेचे माजी सचिव राजेंद्र राऊत यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या सचिव पदासाठी अध्यासी अधिकारी अर्चना माळवे यांच्या अध्यक्षतेत संस्थेच्या सभागृहात संचालकांची सभा घेण्यात आली. शेख लुकमान यांनी या पदासाठी हर्षा टाले यांचे नाव सूचविले तर शरद घारोड यांनी अनुमोदन दिले. सभेपूर्वी माजी सचिव राजेंद्र राऊत यांनी हर्षा टाले यांची निवड करण्याची विनंती संचालकांना केली होती. यानुसार त्यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सभेला संस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, उपाध्यक्ष पवन आत्राम, संचालक गणेश कदम, राजेंद्र पिंपळशेंडे, डॉ. दिलीप चौधरी, अनिल सरताबे, विजय डंभारे, संजय गावंडे, भानुदास राऊत, रामराव टेकाळे, नंदेश चव्हाण, साहेबराव राठोड, संदीप श्रीरामे, सुरेश धावडे, दीपक दोडके, बसवेश्वर डब्बावार, सुमाला पुडके, वनमाला मेटे, सरव्यवस्थापक वसंत राठोड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tired of Harsha as the secretary of the Zilla Parishad Credit Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.