टिपेश्वर अभयारण्यातील प्राणी संकटात$$्रिपांढरकवडा तालुका : वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले, वन विभागाची उदासीनता

By Admin | Updated: March 6, 2017 01:29 IST2017-03-06T01:29:09+5:302017-03-06T01:29:09+5:30

टिपेश्वर अभयारण्यात व परिसरात सतत घडत असलेल्या वाघांच्या मृत्यूचे व फाशात अडकण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने तेथील वन्यप्राणी संकटात सापडले आहे.

$$ Tipperk taluka in danger of animal damage in Tipeshwar Wildlife Sanctuary: Due to the depletion of forest department | टिपेश्वर अभयारण्यातील प्राणी संकटात$$्रिपांढरकवडा तालुका : वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले, वन विभागाची उदासीनता

टिपेश्वर अभयारण्यातील प्राणी संकटात$$्रिपांढरकवडा तालुका : वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले, वन विभागाची उदासीनता

पांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात व परिसरात सतत घडत असलेल्या वाघांच्या मृत्यूचे व फाशात अडकण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने तेथील वन्यप्राणी संकटात सापडले आहे.
पट्टेदार वाघीणीच्या शिकारीचा प्रयत्न झाल्यानंतर जखमी झालेली वाघीण पर्यटकांच्या तसेच खुद्द वन्यजीव विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडल्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या पाच वर्षात चार पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्यानंतरही वन विभागाचे अधिकारी गंभीर नाही. चार वाघांच्या मृत्यूची दप्तरी नोंद असली तरी टिपेश्वर अभयारण्यातील अनेक प्राण्यांची आत्तापर्यंत शिकार झाली असल्याचे वन मजुरांनीच नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. बोथ (बहात्तर) येथे फाशात अडकून पट्टेदार वाघाचा बळी गेला होता. त्यानंतर अभयारण्यातील प्रवेशद्वारापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तिलखान नर्सरीजवळ वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. तसेच सुन्ना व मुकुटबन शिवारातसुद्धा वाघांचा मृतदेह आढळून आला होता.
पाटणबोरी वन परीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिवरडोलच्या जंगलात नायलॉन दोरीच्या फाशात वाघ अडकला होता. परंतु त्या वाघाने स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्यानंतर आता पाच दिवसांपूर्वी गळ्याला फास अडकलेल्या व जखमी झालेल्या स्थितीत असलेली वाघीण टिपेश्वर अभयारण्याच्या जवळच असलेल्या हापशी पॉर्इंटजवळ खुद्द वन अधिकाऱ्यांनी पाहिली. विशेष म्हणजे गळ्यामध्ये फासे अडकलेल्या स्थितीत जखमी असलेली ही वाघीण काही पर्यटकांना १५ ते २० दिवसापूर्वीच दिसली. या वाघणीच्या मानेला दोन ते अडीच इंच खोलीची जखम असून गळ्याला फासा लटकलेला आहे, अशी माहिती त्यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांनासुद्धा दिली. परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे अनेकजण सांगतात. अभयारण्यात नेमके किती पट्टेदार वाघ आहेत, याबाबत अधिकारी वेगवेगळे उत्तर देत असल्याने वाघांची संख्या नेमकी किती, याबाबत अधिकृत माहिती नाही. कमीत कमी आठ ते दहा वाघ या अभयारण्यात असावे, असे परिसरातील जनतेचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)

तेलंगणातील टोळीवर वनाधिकाऱ्यांचा संशय
आंध्र प्रदेशाची सीमा अभयारण्याला लागूनच असल्यामुळे तेथील शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करण्याकतिरा टिपेश्वर अभयारण्यात येतात. यापूर्वी आंध्र प्रदेशातील काही व्यक्तींना जंगली प्राण्यांची शिकार करून चारचाकी वाहनातून नेताना अभयारण्याच्या सिमेजवळ अटकसुद्धा करण्यात आली होती. जंगलामध्ये शिकार करण्यासाठी आलेल्या तेलंगणातील शिकाऱ्यांनी गोळीबारसुद्धा केला होता. शिकारदारांच्या टोळीने या भागात त्यावेळी धुमाकूळ घातला होता. आता हीच टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याची माहिती एका जबाबदार सुत्राने दिली. पट्टेदार वाघीणीची शिकार करण्यामागे याच टोळीचा हात असावा, असा संशयसुद्धा त्यांनी व्यक्त केला.

Web Title: $$ Tipperk taluka in danger of animal damage in Tipeshwar Wildlife Sanctuary: Due to the depletion of forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.