आॅगस्टमध्ये ‘टिप-टिप बरसा पाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:08 IST2017-08-30T21:08:21+5:302017-08-30T21:08:41+5:30

राज्याची राजधानी मुंबईत पावसाने हाहाकार उडविला असताना यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यातही टिप टिप बरसा पाणी असेच चित्र आहे.

 Tip-Tip rainy water in August | आॅगस्टमध्ये ‘टिप-टिप बरसा पाणी’

आॅगस्टमध्ये ‘टिप-टिप बरसा पाणी’

ठळक मुद्दे१५ तालुके कोरडे : पुसदमध्ये मात्र अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्याची राजधानी मुंबईत पावसाने हाहाकार उडविला असताना यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यातही टिप टिप बरसा पाणी असेच चित्र आहे. १५ तालुक्यांचे डोळे आकाशाकडे लागले असताना याला पुसद तालुक्यात मात्र अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासात २३.२५ मिमी पावसाची नोंद झाली. पुसद तालुक्यात ९३ मिमी सर्वाधिक पाऊस कोसळला. तर यवतमाळ ११ मिमी , बाभुळगाव १७ मिमी, कळंब ७ मिमी, आर्णी ९ मिमी, दारव्हा १ मिमी, दिग्रस ३० मिमी, नेर १८ मिमी, उमरखेड ७ मिमी, महागाव ७ मिमी, केळापूर २८ मिमी, घाटंजी २९ मिमी, राळेगाव ६ मिमी, वणी ४७ मिमी, मारेगाव ११ मिमी तर झरीमध्ये ५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४५६ मिमी आहे. पावसाने ५० टक्केची सरासरी गाठली आहे. गतवर्षी ७०५ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत करण्यात आली होती.
पावसात जोर नसल्याने जलप्रकल्पात सरासरी २८ टक्के जलसाठा झाला आहे. यामध्ये बेंबळा २९ टक्के, निम्न वर्धा २८.८९, अधरपूस ६४.६०, अरूणावती २३.२४, अपर पैनगंगा इसापूर ६.५२ तर अडाण प्रकल्पात २८.९५ टक्के पाण्याचा संचय झाला आहे. यामुळे अनेक गावात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यात भीषण जलसंकट जिल्ह्यावर येणार आहे.
गुरूवारनंतर पावसाला ब्रेक
हवामान खात्याने गुरूवार नंतर पावसाला ब्रेक लागणार असल्याचे म्हटले आहे. या काळात मुबलक पाऊस झाला तरच काही प्रमाणातच जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे. या पावसावरच शेतकºयांचे रब्बीचे नियोजन अवलंबून रहाणार आहे.

Web Title:  Tip-Tip rainy water in August