शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

ठार मारण्याच्या आदेशाने वाघग्रस्तांची अखेर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 9:49 PM

डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो वाघग्रस्तांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देवनखात्याला बळ : पांढरकवडा, राळेगाव, कळंबला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाला बेशुद्ध करा व शक्य नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच नागपूर वन मुख्यालयातून जारी करण्यात आले होते. त्यावर आता उच्च न्यायालयानेही मोहर उमटविल्याने पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील हजारो वाघग्रस्तांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.पट्टेदार वाघीण व तिच्या चार पिलांनी तीन तालुक्यातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले आहे. आतापर्यंत या वाघाने डझनावर बळी घेतले. त्यात महिला व पुरुष शेतकरी-शेतमजुरांचा समावेश आहे. ठिकठिकाणी व्याघ्र दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या भीतीपोटी सायंकाळी शेतकरी-शेतमजूर शेतात थांबत नाही. अंधारापूर्वीच घराची वाट धरतात. त्यानंतरही एकट्या-दुकट्याला गाठून वाघ शिकार साधतो आहे. पाठोपाठ शिकारी होत असल्याने नागरिक संतापले आहेत. जीव जात असतानाही वन विभाग काहीच करीत नाही म्हणून नागरिकांचा रोष आहे. वाघाला पकडावे आणि जिल्ह्याच्या हद्दीबाहेर काढावे, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे. वन खात्याने ५० ते ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज तैनात करून त्या दृष्टीने प्रयत्नही केले. मात्र अद्याप यश आले नाही. अशातच वन्यजीव विभागाच्या नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला बेशुद्ध करून पकडा आणि त्यात यश येत नसेल तर जीवे ठार मारा, असे आदेश नुकतेच जारी केले. त्यावर वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त करीत आक्षेप नोंदविला. मात्र वन खात्याचा हा आदेश खुद्द नागपूर उच्च न्यायालयानेही गुरुवारी उचलून धरला. न्यायालयानेसुद्धा वाघ बेशुद्ध करून सापडत नसेल तर त्याला ठार मारणेच नागरिकांच्या हिताचे ठरेल, असा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाची वार्ता वाऱ्या सारखी पसरली. त्यामुळे वाघाच्या दहशतीत असलेल्या पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील नागरिकांनी जणू सुटकेचा नि:श्वास टाकला. या आदेशाने हे नागरिक ‘रिलॅक्स’ झाले आहेत.नरभक्षक वाघिणीचा थर्मल सेन्सर ड्रोनने शोधहायटेक मोहीम : झुडपांच्या कापणीला सुरुवातलोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : दोन वर्षांपासून वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यासाठी सेन्सर ड्रोनची मागणी करण्यात आली आहे. ३०० हेक्टर क्षेत्रात जंगलातील झुडपे कापण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राळेगाव, पांढरकवडा, कळंब या परिसरात या वाघिणीची दहशत आहे.सातत्याने वाघिणीच्या हल्ल्यामुळे बळी जात आहेत. १४ जणांना प्राण गमवावा लागला. आता वनविभागाविरोधात प्रचंड जनक्षोभ तयार झाला आहे. वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी शक्य ते सर्वच उपाय अवलंबिले जात आहे. यासाठी मॉनिटरिंग कमिटी स्थापन केली आहे. अमरावती येथील शीघ्र कृती दल, नवेगाव, नागजिरा, पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष पथक, व्याघ्र संरक्षण दलातील जवानांची तुकडी या सर्वांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. ६० पेक्षा अधिक कर्मचारी वाहनासह वाघिणीचा शोध घेण्यासाठी तैनात केले आहे. वाघपीडित क्षेत्रात शामाप्रसाद मुखर्जी योजना राबविली जात आहे. क्रियान्वयन व त्यास गती देण्याचे प्रयत्न वनविभाग करत आहे. जंगल पावसामुळे हिरवेकंच असून सात हजार हेक्टर क्षेत्रात २५ पेक्षा अधिक गावे या वाघिणीच्या दहशतीत आहे. विस्तीर्ण क्षेत्रामुळे मोहीम राबविताना अनेक अडचणी येत आहे.केली गाईची शिकारवाढोणाबाजार : लगतच्या आंजी येथे वाघाने गाईची शिकार केल्याचे बुधवारी उघडकीस आले. परिसरातील आंजी येथे वन विभागाच्या कंपार्टमेंट ६५३ मध्ये बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता गुराखी गार्इंचा कळप घेवून घराकडे येत होता. कळपावर वाघाने हल्ला केला. यात गाय ठार झाली. काही दिवसांपूर्वीच या परिसरातील वेडसी येथे एका गुराख्याला ठार मारले होते. वाघ याच परिसरातील आठमुर्डी शिवारात एका निलगाईचा मृतदेह आढळला. या निलगाईचीही वाघानेच शिकार केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांमध्ये दहशत आहे.पट्टेदार वाघिणीचा आधी शोध घेऊन तिला बेशुद्ध करण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात यश येत नसेल तरच शेवटचा पर्याय म्हणून नाईलाजाने तिला ठार मारण्यात येईल. आता उच्च न्यायालयानेही आज त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव, नागपूर)

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग