शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

टिपेश्वर अभयारण्यात पायात फास अडकलेला वाघ मरणाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:24 IST

गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायात फास अडकल्याने टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ मरणाच्या दारात उभा आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असून त्यामुळे वनविभाग चिंतेत आहे.

ठळक मुद्देशिकाऱ्यांनी फास लावल्याची शंका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायात फास अडकल्याने टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ मरणाच्या दारात उभा आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असून त्यामुळे वनविभाग चिंतेत आहे. विशेष म्हणजे या वाघाला कॉलर आयडी बसविली आहे. दिवसेंदिवस या वाघाची प्रकृती ढासळत असून त्याला वाचविण्यासाठी वनविभागाची धावपळ सुरू आहे.बुधवारी सकाळी ८.४५ वाजता टिपेश्वर अभयारण्यात सफारीसाठी आलेले भट्टू नामक पर्यटक गाईड सलमान बरकत खान यांच्यासोबत अभयारण्यात फिरत असताना कक्ष क्रमांक १०० मध्ये पिलखान नाल्याच्या वरच्या बाजुला एक वाघ दिसला. पर्यटकांनी त्याचे छायाचित्र घेतले असता, सदर वाघाच्या उजव्या पायाच्या पंजाच्यावर दोरीचा फास अडकून जखम झाल्याचे निदर्शनास आले. दुसºया वाहनातील पुणे येथील पर्यटक आदित्य क्षीरसागर व त्यांचे गाईड राजेंद्र चुकाबोतलावार यांनीसुद्धा या बाबीला पुष्टी दिली. माहिती मिळताच विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) डॉ.केतन पातोंड हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पिलखान नाल्याजवळ पोहोचले. अँटेनाद्वारे लोकेशन घेतले असता, वाघ नाल्याच्या गवताच्या दिशेने असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी निरीक्षण केले असता, सदर वाघाने डरकाळी फोडली व तो तेथून निघून गेला. त्यामुळे त्याचे छायाचित्र मिळू शकले नाही.टिपेश्वर अभयारण्यात टी-वन वाघिणीचे तीन बछडे होते. हे बछडे आता वयाने मोठे झाले आहेत. या तीनपैकी दोन वाघांना काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या एका चमूने कॉलर आयडी बसविली होती. या अभयारण्यात शिकारीसाठी फास लावले जात असल्याची चर्चा असून त्यातूनच ही घटना समोर आल्याचे बोलले जाते. गंभीर बाब ही की, तीन वाघांपैकी एकाच्या गळ्यात काही महिन्यांपूर्वी फास अडकला होता. आता दुसºयाच्या पायात फास अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सदर फास हा काहींच्या मते नायलॉन दोरीचा, तर काहींच्या मते तारांपासून तयार केलेला आहे. दिवसेंदिवस वाघाच्या पायाची जखम चिघळत असून त्यामुळे वाघाची प्रकृतीही ढासळत चालली आहे.टिपेश्वर अभयारण्यात ८ मार्च, १५ मार्च व २९ एप्रिल रोजी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून गस्त करण्यात आली. त्यावेळी अभयारण्य क्षेत्रात तसेच सिमेवरील क्षेत्रात कुठेही फासे आढळले नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. मात्र ७ मे रोजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गस्तीदरम्यान कक्ष क्रमांक एकमध्ये शंभू नाल्यात चार-पाच ठिकाणी शिकारीसाठी दोरीचे फास लावल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर गस्ती करणाऱ्या चमूने ते फास ताब्यात घेतले. कोबई, कोपामांडवी व अंधारवाडी या गावांमध्ये फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात असून आरोपी सापडल्यास त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले. जखमी असलेल्या वाघाला बेशुद्ध करून त्याच्यावर उपचार करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे विभागीय वनअधिकारी प्रमोद पंचभाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाच्या उजव्या पायात फास अडकला असून त्याची जखम गंभीर स्वरूपाची आहे. यासंदर्भात माहिती घेणे सुरू असून सदर वाघाच्या पायातील फास काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.- प्रमोद पंचभाई, उपवनसंरक्षक (वन्यजीव) पांढरकवडा

टॅग्स :Tigerवाघ