लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : लगतच्या अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर असून या वाघाने दिवसभरात तीन शेळ्यांचा फडशा पाडला. गेल्या एक महिन्यापासून या परिसरात वाघाचा वावर असून नागरिकांमध्ये मात्र चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.शनिवारी एक वाघ भास्कर तोडसाम यांच्या शेतात दिवसभर तळ ठोकून होता. सदर शेतकऱ्याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास वाघाचे चित्रीकरणसुद्धा केले. दरम्यान, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सदर वाघाने तीन शेळ्यांचा फडशा पाडला. तसेच अनेकांना शेतशिवारात वाघाचे दर्शन झाले. सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून निंदन, डवरा, फवारणीची कामे सुरू आहे. कापसाची झाडे दोन ते तीन फूटापर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे शेतशिवारात काम करणाºया मजूर व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. मात्र त्याची दखलच घेतली नाही. वनविभागाने जाळीचे कंपाउंड करून देण्याचे मान्य केले होते. मात्र अद्यापही या कामाला सुरूवात करण्यात आली नाही. दरम्यान, अंधारवाडी, कोबई, कवठा, कोपामांडवी, सुंकडी, धरमगोटा आदी गावांमध्ये वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघ आता गावात व शेतात येऊ लागल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST
शनिवारी एक वाघ भास्कर तोडसाम यांच्या शेतात दिवसभर तळ ठोकून होता. सदर शेतकऱ्याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास वाघाचे चित्रीकरणसुद्धा केले. दरम्यान, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सदर वाघाने तीन शेळ्यांचा फडशा पाडला. तसेच अनेकांना शेतशिवारात वाघाचे दर्शन झाले. सध्या खरिपाचा हंगाम सुरू असून निंदन, डवरा, फवारणीची कामे सुरू आहे. कापसाची झाडे दोन ते तीन फूटापर्यंत वाढलेली आहे.
अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर
ठळक मुद्देतीन शेळ्या ठार : एक महिन्यापासून वाघाचा परिसरात मुक्तसंचार