पुण्याचे तिकीट २८००

By Admin | Updated: October 7, 2014 23:39 IST2014-10-07T23:39:58+5:302014-10-07T23:39:58+5:30

दचकलात ! होय हे खरे आहे. पुण्याला ट्रॅव्हल्सने जायचे असेल तर २८०० रुपये मोजावेच लागतील. एसटी बसच्या भाड्याच्या तब्बल पाच पट भाडे ट्रॅव्हल्सधारक आकारत आहे. सणा-सुदीच्या काळात

Ticket for Pune 2800 | पुण्याचे तिकीट २८००

पुण्याचे तिकीट २८००

प्रवाशांची लूट : ट्रॅव्हल्सचे भाडे एसटी बसच्या पाच पट अधिक
यवतमाळ : दचकलात ! होय हे खरे आहे. पुण्याला ट्रॅव्हल्सने जायचे असेल तर २८०० रुपये मोजावेच लागतील. एसटी बसच्या भाड्याच्या तब्बल पाच पट भाडे ट्रॅव्हल्सधारक आकारत आहे. सणा-सुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी प्रवाशांची अक्षरश: लूट चालविली आहे. या भरमसाठ भाडेवाढीकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सणा-सुदीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. याच संधीचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून दरवर्षी घेतला जातो. या काळात भाड्यांमध्ये वाढ केली जाते. मात्र यावर्षी झालेली भाडेवाढ प्रवाशांचे डोळे पांढरे करणारी आहे. यवतमाळातून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून यवतमाळात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यवतमाळातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आहे. दिवाळीसाठी ही मंडळी गावी येत असून दिवाळी आटोपताच पुण्याला परत जाणार आहे. तसेच अनेक कर्मचारी व नागरिकही पुण्याला जाणे-येणे या काळात करतात. या संधीचा फायदा घेण्यासाठी ट्रॅव्हल्स मालकांनी एसटीच्या तब्बल पाच पट भाडेवाढ केली आहे. त्यातही बुकींग १५ ते २० दिवस आधी करावे लागत आहे.
यवतमाळ ते पुणे एसटी बसची तिकीट ६७८ रुपये आहे. तर निमआराम बसचा दर ७८३ रुपये आहे. असे असतानाही दिवाळीत ट्रॅव्हल्स मालकांनी चक्क यवतमाळ-पुणे तिकीट भाडे १७०० ते २८०० रुपये केले आहे. या दरानुसारच सध्या यवतमाळातील ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर बुकींग सुरू आहे. प्रवाशांना लुटण्याचा हा प्रकार दरवर्षीच सुरू असतो. गतवर्षी पुण्याचे तिकीट १८०० रुपये होते. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ होऊन २८०० रुपये झाली आहे. एसटी बस पेक्षा आरामदायी आणि नॉन स्टॉप जाता येते म्हणून अनेक प्रवासी खासगी बसला पसंती देतात. तसेच अनेक खासगी बसेस वातानुकुलित असल्याने प्रवासी त्याकडे आकर्षित होतात. मात्र त्यांच्या असाहय्यतेचा फायदा घेत अक्षरश: ट्रॅव्हल्स मालकांनी लूट चालविली आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Ticket for Pune 2800

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.