भांबोरा येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी

By Admin | Updated: June 25, 2016 02:25 IST2016-06-25T02:25:38+5:302016-06-25T02:25:38+5:30

घाटंजी तालुक्यातील तळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी होण्याची घटना गुरुवारी घडली. यात महिला जिल्हा परिषद सदस्याला धक्काबुक्की करण्यात आली.

Thunderstorms in two groups at Bhambora | भांबोरा येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी

भांबोरा येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी

जिल्हा परिषद सदस्याला धक्काबुक्की : माजी पंचायत समिती सदस्यासह दोनही गटांवर गुन्हा
तळणी : घाटंजी तालुक्यातील तळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी होण्याची घटना गुरुवारी घडली. यात महिला जिल्हा परिषद सदस्याला धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी माजी पंचायत समिती सदस्यासह दोनही गटांच्या २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्य उषा रामसिंग आडे यांच्या तक्रारीनुसार, त्या गुरुवारी गावाशेजारी सुरू असलेले पांदण रस्त्याचे काम पाहण्यासाठी गेल्या. त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दत्ता राठोड व त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
त्यात त्यांच्या पाठीला मार लागला. या तक्रारीवरून पोलिसांनी माजी पंचायत समिती सदस्य सहदेव दत्ता राठोड, स्वानंद अशोक चव्हाण, दीपला वसराम जाधव, दिलीप रामसिंग राठोड, सुरेश रामसिंग राठोड, गणेश रामलाल राठोड, रामजीवराव राठोड, नामदेव हुढु राठोड, बादल रामसिंग राठोड, भारत मारोती राठोड, मनोज दीपला जाधव यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर माजी पंचायत समिती सदस्य सहदेव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांना गावातील काही मंडळींनी रस्त्यात अडवून शिवीगाळ करून मारहाण केली. लाठ्या काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केल्याने जखमी झाल्याचे म्हटले आहे.
त्यावरून पोलिसांनी विशाल रामसिंग राठोड, रामसिंग आनंद राठोड, नीलेश बंडू राठोड, दुलसिंग कनीराम आडे, खुशाल देवसिंग राठोड, पिंट्या श्रावण राठोड, श्रावण झिता राठोड, रामधन गोपा राठोड, जितेश बद्दूसिंग चव्हाण, जितेंद्र दत्ता राठोड, दत्ता नथ्थू राठोड, महादेव सूर्यभान राठोड सर्व रा. भांबोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावातील वातावरण तापले असून अधिक तपास ठाणेदार शिवा ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सुभाष डोंगरे, विठ्ठल बुरेवार करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Thunderstorms in two groups at Bhambora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.