मुलीला पळविणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: August 13, 2015 03:09 IST2015-08-13T03:09:38+5:302015-08-13T03:09:38+5:30

एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या लगतच्या लोहारा येथील एका तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Three years of punishment for the girl child | मुलीला पळविणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

मुलीला पळविणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

लोहारा येथील तरुण : तीन दिवस ठेवले होते डांबून
यवतमाळ : एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या लगतच्या लोहारा येथील एका तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
गोपाल तुकाराम गावंडे (३९) रा. सुर्याेदय नगर, लोहारा असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याचा वाघापूर परिसरातील एका कुटुंबाशी परिचय होता. त्यातूनच या कुटुंबातील एका १७ वर्षीय युवतीवर त्याची वाईट नजर होती. हा प्रकार लक्षात येताच त्या कुटुंबाने गोपालशी असलेले सबंध तोडले होते. परंतु त्यानंतरही २८ सप्टेंबर २०१३ रोजी गोपालने वाघापूर येथील घरी जावून मुलीच्या वडिलांना मुलीचे लग्न करू नको, तसे केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन दिवसांनी ३० सप्टेंबर २०१३ रोजी सदर मुलगी शिकवणीसाठी सायकलने गेली असता घरी परतच आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती आढळली नाही. त्यावरून २ आॅक्टोंबर २०१३ रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र दुसऱ्या दिवशी मुलगी घरी परतली. यावेळी तिने आपल्याला गोपाल गावंडे याने दुचाकीवर बसवून पळूवन नेल्याचे सांगितले. त्यानंतर गोपालने त्याच्या लोहारा येथील सुर्याेदय नगरातील घरात तीन दिवस कोंडून ठेवून आपला छळ केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने सांगितले. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस उपनिरिक्षक तेजस्विनी गिरसावळे यांनी आरोपी गोपाल गावंडे याला अटक केली. प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. या प्रकरणी दहा साक्षीदार तपासण्यात येऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.सी. चाफले यांनी गोपाल गावंडे याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. निलीमा जयवंत यांनी काम पाहले. (प्रतिनिधी)

Web Title: Three years of punishment for the girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.