जिल्ह्यातील तीन तालुका कृषी अधिकारी निलंबित
By Admin | Updated: March 14, 2015 02:16 IST2015-03-14T02:16:23+5:302015-03-14T02:16:23+5:30
कृषी विभागातील तीन तालुका कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तीन तालुका कृषी अधिकारी निलंबित
यवतमाळ : कृषी विभागातील तीन तालुका कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तब्बल तीन वर्षापूर्वी झालेल्या चौकशीवरून या अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. यामध्ये घाटंजी येथील दोन आणि पुसद येथील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
ग्रामविकास विभाग आणि जलसंधारण विभागाने दक्षता समितीने केलेल्या अहवालावरून ही कारवाई केली आहे. पुसद आणि घाटंजी या तालुक्यामध्ये झालेल्या कामाचे मुल्याकंन करून अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात घाटंजी येथील प्रभारी तालुका कृषी अधिकारी राऊत, तालुका कृषी अधिकारी घुले, पुुसद येथील तालुका कृषी अधिकारी कावळे यांना निलंबित करण्यात आले आहे. अचानक धडकलेल्या निलंबन आदेशामुळे कृषी विभागात चांगलीच खळबळ निर्माण झाली. इतर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली काय याचाही चर्चा दबक्या स्वरात सुरू होती.
पॅकेजच्या घोषणेनंतर कृषी विभागातील विविध स्वरुपाच्या योजनांमध्ये मोठ्याप्रमाणात अनियमितता झाल्याचे प्रकरण पुढे येत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)