अपघातात आरोग्य कर्मचाऱ्यासह तीन गंभीर
By Admin | Updated: February 20, 2017 01:23 IST2017-02-20T01:23:52+5:302017-02-20T01:23:52+5:30
भरधाव कार चालकाचे नियंत्रण गेल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटून अक्षरश: चुराडा झाली.

अपघातात आरोग्य कर्मचाऱ्यासह तीन गंभीर
तिवसाची घटना : कारचा झाला चुराडा
यवतमाळ : भरधाव कार चालकाचे नियंत्रण गेल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटून अक्षरश: चुराडा झाली. दारव्हा मार्गावरील तिवसाजवळ रविवारी दुपारी झालेल्या या अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य कर्मचाऱ्यासह तीन जण जखमी झाले.
विलास तिडके (५५) रा. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय क्वॉर्टर, त्यांची पत्नी सुनिता विलास तिडके (४५), मुलगी रोशनी, हे तिघे गंभीर जखमी झाले. तिडके कुटुंबीय पाथ्रडदेवी येथे दर्शनासाठी कारने (एम. एच.२९-आर. ६४३७) गेले होते. दुपारी यवतमाळकडे येत असताना तिवसाजवळच्या वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या खाली उतरले. यात कारचा चुराडा झाला. जखमींना तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. विलास तिडके हे रूग्णालयात कक्ष सेवक म्हणून कार्यरत आहे. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)