कार अपघातात तीन गंभीर
By Admin | Updated: June 30, 2016 02:39 IST2016-06-30T02:39:52+5:302016-06-30T02:39:52+5:30
परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन कार एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले.

कार अपघातात तीन गंभीर
भोसाजवळची घटना : जखमी नागपूर येथील
महागाव : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन कार एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आर्णी-धनोडा मार्गावरील भोसा गावाजवळ बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला.
रजनिश जैन (६१), अजय राजकुमार पाटणी (५०) आणि रवी कासलीवाल (५५) सर्व रा.नागपूर आणि सुरेंद्र जैन अशी जखमींची नावे आहेत. नागपूर येथील जैन परिवार नांदेड येथे जात होते. त्यावेळी भोसा गावासमोर समोरून आलेल्या इनोव्हा कारची जबर धडक बसली. यात तिघेजण गंभीर जखमी झाले, तर सुरेंद्र जैन यांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. जखमींना प्रथम लोणबेहळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर अधिक उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)