शिवथाळीसाठी तीन ठिकाणे निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:10+5:30

शिवथाळी भोजन व्यवस्थेच्या अनुषंगाने यवतमाळात तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हनुमान आखाडा चौक या तीन ठिकाणाचा समावेश आहे. या तीन ठिकाणांची पुरवठा विभागाने पाहणी केली आहे. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

Three places are fixed for Sivathali | शिवथाळीसाठी तीन ठिकाणे निश्चित

शिवथाळीसाठी तीन ठिकाणे निश्चित

ठळक मुद्देप्रजासत्ताक दिनापासून प्रारंभ : खानावळ, हॉटेल अथवा बचतगटांकडे सोपविणार काम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवथाळी भोजन योजनेसाठी विविध मार्गदर्शक सूचना पुरवठा विभागात पाहेचल्या आहे. त्यानुसार यवतमाळात तीन ठिकाणी शिवथाळी भोजन व्यवस्था सुरू केली जाणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून या शिवथाळी भोजन व्यवस्थेचा शुभारंभ होणार आहे. ४५० व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे.
शिवथाळी भोजन व्यवस्थेच्या अनुषंगाने यवतमाळात तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हनुमान आखाडा चौक या तीन ठिकाणाचा समावेश आहे. या तीन ठिकाणांची पुरवठा विभागाने पाहणी केली आहे. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
या अनुषंगाने पुरवठा विभागाकडे अर्ज आले आहे. मात्र हॉटेलिंगचा परवाना असणारे, मालकीची जागा असणारे आणि मेस चालकांनाच ही शिवथाळी भोजन व्यवस्था मिळणार आहे.
प्रत्येक केंद्रावर १५० थाळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भोजन करणाऱ्यांना १० रूपयात थाळी दिली जाणार आहे. इतर रक्कम अनुदान स्वरूपात शिवभोजन थाळी निवड झालेल्या भोजनालयास मिळणार आहे.
प्रजासत्ताक दिनापासून या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. सर्वसामान्य, गरजू आणि गरीब व्यक्तींनाच हे भोजन दिले जाणार आहे. या ठिकाणावरून इतरत्र भोजन नेण्यास बंदी राहणार आहे.

दहा रुपयात मिळणार थाळी
शिवथाळीसाठी गरजू गरीब व्यक्तींना भोजन दिले जाणार आहे. तसा कटाक्ष पाळण्याच्या सूचना केंद्राला देण्यात आल्या आहेत. भोजनासाठी येणाºया व्यक्तींंना दहा रुपयात शिवथाळी दिली जाणार आहे. या ठिकाणी पोळी, भाजी, भात, वरण असा संपूर्ण मेन्यू राहणार आहे.

Web Title: Three places are fixed for Sivathali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.