आयटीआय समोरील खुनात आणखी तिघांना अटक
By Admin | Updated: November 11, 2016 02:13 IST2016-11-11T02:13:32+5:302016-11-11T02:13:32+5:30
येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर बुधवारी सायंकाळी सुनील गोविंद पवार रा. अंबिका नगर

आयटीआय समोरील खुनात आणखी तिघांना अटक
यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर बुधवारी सायंकाळी सुनील गोविंद पवार रा. अंबिका नगर याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या घटनेतील आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आता अटकेतील आरोपींची एकूण संख्या पाच झाली आहे.
अनिल उर्फ हनिसिंग विजय थूल (२८) रा. आंबेडकर चौक पाटीपुरा, आकाश उर्फ काल्या चिरंजीव बोरकर (१९) रा. महात्मा फुले चौक आणि प्रितमसिंग दामोधर रामटेके (३२) रा. अशोक नगर पाटीपुरा या तिघांना टोळी विरोधी पथकाने अटक केली. यातील अनिल थूल व आकाश बोरकर या दोघांना देवळी (जि. वर्धा) येथून तर प्रितमसिंग रामटेके याला अशोक नगर, पाटीपुरा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांना कालच बाभूळगाव तालुक्यातून अटक झाली. आता अटकेतील आरोपींची संख्या ही पाच झाली आहे. या सर्व आरोपींना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, एसडीपीओ पियूष जगताप व पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनात टोळी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, पोलीस उपनिरिक्षक संतोष मनवर, जमादार ऋषी ठाकूर, गजानन धात्रक, किरण पडघण, बंडू मेश्राम, विनोद राठोड यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)