जिल्हा बँक निवडणुकीला तीन महिने मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:10+5:30
जिल्हा बँकेची निवडणूक २६ मार्च रोजी होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गर्दी टाळण्याकरिता ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्या आहे. याच आधारावर बँक निवडणूक स्थगितीची मागणी केली जाणार आहे.

जिल्हा बँक निवडणुकीला तीन महिने मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकनिवडणूक स्थगित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत बँकनिवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून गुरुवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक २६ मार्च रोजी होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गर्दी टाळण्याकरिता ग्रामपंचायत निवडणुका स्थगित केल्या आहे. याच आधारावर बँक निवडणूक स्थगितीची मागणी केली जाणार आहे.
जिल्हा बँक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आता उमेदवारांचे नामांकन मागे घेतल्याने लढतीचे चित्रही स्पष्ट झाले. २६ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार असून २८ मार्चला मतमोजणी आहे. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली असताना ही निवडणूक घेणे प्रशासनाच्या दृष्टीने सोईस्कर ठरणारे नाही. शिवाय मतदान केंद्रावरील गर्दीही विषाणू संसर्गासाठी कारणीभूत ठरण्याचा धोका आहे.