शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावरील तिजोरी फोडून साडेतीन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:45 IST

येथील रेल्वेस्थानकावर चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. चोरट्याने तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडली. दोन दिवस सुटी आल्याने येथे कोणीच फिरकले नाही. याच संधीचा लाभ चोरट्यांनी घेतला. तीन लाख ६१ हजारांची रोकड लंपास केली.

ठळक मुद्देदारव्हा रोड : तपास रेल्वे पोलिसांकडे वर्ग, सुटीचा घेतला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील रेल्वेस्थानकावरचोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. चोरट्याने तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडली. दोन दिवस सुटी आल्याने येथे कोणीच फिरकले नाही. याच संधीचा लाभ चोरट्यांनी घेतला. तीन लाख ६१ हजारांची रोकड लंपास केली.या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. या रेल्वे स्थानकावरून यवतमाळ-मूर्तीजापूर ही शकुंतला नॅरोगेज रेल्वे धावत होती. मात्र २७ जुलै २०१७ पासून ही ट्रेन बंद झाली होती. त्यामुळे या स्थानकावरून केवळ तिकीट आरक्षण काढण्यात येते.१८ आणि १९ फेब्रुवारी झालेल्या आरक्षणाची रक्कम तीन लाख ६१ हजार ३२५ रुपये रेल्वे स्थानकावरील तिजोरीमध्ये ठेवून होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रेल्वे स्थानकाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या काच फोडून त्यांनी तिजोरीतील रक्कम लंपास केली.या घटनेची माहिती मूर्तीजापूर रेल्वे तसेच भुसावळ रेल्वे स्थानकाला देण्यात आली. भुसावळ रेल्वे स्थानकाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, मूर्र्तीजापूरचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर बडनेरा रेल्वे पोलीस पथकानेही घटनास्थळाला भेट दिली. रेल्वे स्थानकावर रात्रीच्या सुमारास अनेक गैरप्रकार चालतात. हा गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. यापैकी कोणीतरी येथे हात साफ केला असवा, असा संशय व्यक्त होत आहे. तूर्तास या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रकरण रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीतील असल्याने घटनास्थळाचा पंचनामा करून रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. आता पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेThiefचोर