शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

फार्मर आयडीविना सात जिल्ह्यांतील तीन लाख शेतकरी प्रक्रियेबाहेर

By रूपेश उत्तरवार | Updated: June 5, 2025 13:01 IST

Yavatmal : फळबागेच्या विम्याला मुकणार, १५ जूनपर्यंत प्रक्रिया अवलंबणे अशक्यच

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी फार्मर आयडी सक्तीचा केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभझाला आहे. पुनर्रचित फळ पिकांच्या विमा योजनेला याचा पहिला फटका सहन करावा लागणार आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने फार्मर आयडी नसेल तर खरीप हंगामातील पीक आणि फळपिकांचा विमाच काढता येणार नाही. असे आदेश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी काढले आहेत. १५ जूनपर्यंत फार्मर आयडी न काढल्याने लाखो शेतकऱ्यांना विमा संरक्षणाला मुकावे लागणार आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत मृग आणि आंबिया बहार फळपिकांच्या विम्यासाठी अॅग्रिस्टॅक बंधनकारक करण्यात आले आहे. 

यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, पालघर या जिल्ह्यातील १७ लाख ८७ हजार ३९६ शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायचे होते. प्रत्यक्षात १४ लाख ६७ हजार २४७शेतकऱ्यांनाच फार्मर आयडी काढता आला. तीन लाख २० हजार १४९ शेतकरी अजूनही या प्रक्रियेच्या बाहेर आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याची परिस्थिती अशीच आहे. यातून चिंता व्यक्त केली जात आहे.

नुकसानीची मदत मिळणार नाहीहवामानात कधीही बदल घडून येतो. यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत पिकांचा विमा असेल तर शेतकऱ्यांना मोठा आधार होतो. मात्र फार्मर आयडी नसल्याने अनेक शेतकऱ्यांना फळ पिकांचे संरक्षण अर्ज भरता येणार नाही. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना मदत मिळण्याचे मार्ग बंद होणार आहेत.

तांत्रिक कारणामुळे वाढल्या अडचणी....

  • फार्मर आयडी काढण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच झाला नाही. यामुळे फार्मर आयडीची प्रक्रिया करताना त्याचा ओटीपी शेतकऱ्यांना मिळाला नाही. ओटीपी मिळाल्यानंतरच फार्मर आयडीची प्रक्रिया पुढे जाते. यातून अनेक शेतकरी फार्मर आयडी काढू शकले नाही.
  • अनेक शेतकरी स्थलांतरित आहेत. या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण केली नाही.
  • काही शेतकरी परराज्यात राहतात. महाराष्ट्रात त्यांची 3 शेती आहे. याठिकाणी नोंदणी करताना अडचणी येत आहेत.
  • अनेक शेतकरी मयत आहे. त्यांच्याच नावावर शेती आहे. फेरफार प्रक्रिया न झाल्याने अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढता आला नाही.
टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरीfarmingशेती