दोन अपघातात तीन ठार, महिलांसह २१ जखमी
By Admin | Updated: October 13, 2016 00:36 IST2016-10-13T00:36:02+5:302016-10-13T00:36:02+5:30
जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर महिलांसह २१ जण जखमी झाले. दुर्गा विसर्जन करून परतणाऱ्या भाविकांच्या अॅपे आॅटोरिक्षाला...

दोन अपघातात तीन ठार, महिलांसह २१ जखमी
सायखेडाजवळ दुचाकी अपघात : भोसाजवळ आॅटोरिक्षाला इंडिकाची धडक
लोणबेहळ/रुंझा: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर महिलांसह २१ जण जखमी झाले. दुर्गा विसर्जन करून परतणाऱ्या भाविकांच्या अॅपे आॅटोरिक्षाला इंडिका कारने माहूर मार्गावरील भोसा गावाजवळ धडक दिल्याने एक महिला ठार तर दोन्ही वाहनातील महिलांसह २१ भाविक जखमी झाले. तर यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील सायखेडा (धरण) फाट्यावर दोन दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.
आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील जय महाकाली दुर्गोत्सव मंडळाचे बुधवारी दुर्गा विसर्जन होते. त्यासाठी गावातील भाविक ट्रॅक्टर आणि अॅपे आॅटोरिक्षाने धनोडा येथील पैनगंगेवर गेले होते. परतीच्या प्रवासात भोसा गावाजवळ दुपारी ४ वाजता अॅपे आॅटोरिक्षाला समोरून येणाऱ्या इंडिकाने जबर धडक दिली. त्यामुळे भाविकांनी खचाखच भरलेला अॅपे आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात मीरा नामदेव पिंपळे (६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अॅपे आॅटोरिक्षातील ज्योती संतोष हिरुळकर (३५), माधव सुभाष पिंपळे (२५), पार्वती मारोती कुमरे (४५), सरस्वती अंबादास देठे (६०), रामेश्वर देविदास ढगे (३०), केवल दीपक जयस्वाल (२०), विश्वनाथ सोनबा पिंपळे (६०), वाघाबाई मारोती तिळे (६०), संतोष शंकर दबडगाव (४०), दादाराव नत्थु ढगे (४०), शोभा सुभाष पिंपळे (४०), जलपथ लक्ष्मण तोडसाम (२१), सुंदरबाई विश्वनाथ पिंपळे (६०), आकाश गणपत निचत (१८), वृषभ सुभाष केशरवानी (३१), पंचफुला आनंदा हातमोडे (६०) सर्व रा. लोणबेहळ, ता. आर्णी तर इंडिका कारमधील राखी सुरेश कल्याण (२७), रिना सुरेश कल्याण (२५), पिंकी (२०) सर्व रा. नागपूर, संजय प्रताप गोंधळे (२६), माधुरी प्रताप गोंधळे (२६) दोघे रा. यवतमाळ असे जखमींची नावे आहेत.
अपघातात अनेकांच्या हाता-पायाला जबर मार लागला असून, जखमींना तात्काळ लोणबेहळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी सर्व जखमींना एका ट्रॅक्टरव्दारे रुग्णालयात दाखल केले.
तर यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील सायखेडा (धरण) गावाजवळ बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्या. त्यात प्रफुल्ल मनोहर शेंडे (२५) रा.डोंगरखर्डा ता.कळंब आणि गुलशन यशवंत घोडाम (२५) रा.पाथरी ता.पांढरकवडा ठार झाले. तर संतोष कवडू तोडसाम (२८) रा.सायखेडा नवाटी ता.यवतमाळ आणि अनिल मडावी (२५) रा.दिग्रस अशी जखमींची नावे आहे.
जखमींना उमरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना पांढरकवडाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरमे, जमादार होमदेव किनाके यांनी रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)