तस्करांच्या हल्ल्यात तीन वन कर्मचारी गंभीर

By Admin | Updated: May 4, 2016 03:28 IST2016-05-04T03:28:00+5:302016-05-04T03:28:00+5:30

मराठवाड्यातील सागवान तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना पैनगंगा अभयारण्यातील खरबी वर्तुळात

Three forest personnel serious in the attack of smugglers | तस्करांच्या हल्ल्यात तीन वन कर्मचारी गंभीर

तस्करांच्या हल्ल्यात तीन वन कर्मचारी गंभीर

 उमरखेड : मराठवाड्यातील सागवान तस्करांनी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना पैनगंगा अभयारण्यातील खरबी वर्तुळात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. यात तीन वन कर्मचारी जखमी झाले असून एका सागवान तस्कराला अटक करण्यात आली. तर पाच जण पसार झाले आहे.
पैनगंगा अभयारण्यातील खरबी जंगलात सागवान तस्कर शिरल्याची माहिती खरबी वनपरिक्षेत्र अधिकारी संदेश पाटील यांना मिळाली. त्यावरुन वन विभागाचे पथक आणि एसटीपीएफचे जवान जंगलात रवाना झाले. सायंकाळी ६ वाजता कक्ष क्र. ६०३ मध्ये सहा जण सागवान वृक्षाची कटाई करीत असल्याचे लक्षात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुफान हाणामारी झाली. यात आर.एल. यादव, महेश ठणके, गौतम साळवे हे वन कर्मचारी जखमी झाले. ही परिस्थिती वन कर्मचाऱ्यांनी तस्करांचा पाठलाग केला. त्यावेळी तस्कर शेख अल्लाउद्दीन शेख उस्मान (४६) रा. किनवट हा तावडीत सापडला. तर इतर पाच जण अंधाराचा फायदा घेत किनवट शहराकडे पसार झाले. यानंतर शेख अल्लाउद्दीनने दिलेल्या माहितीवरून त्याच्यासह शेख साहब जैनुद्दीन, शेख समू शेख मिज, शेख फिर्दोस शेख रतन, संतोष गड्डमवार, शेख मोहंमद शेख महबूब या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेख अल्लाउद्दीनची पाच दिवसाची वन कोठडी घेण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी खरबी बीटमध्ये वन कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three forest personnel serious in the attack of smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.