यवतमाळमध्ये तीन बनावट दारू विक्रेत्यांना अटक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2023 10:55 IST2023-12-12T10:54:35+5:302023-12-12T10:55:02+5:30
तिघेही बनावट दारू बनवून कमी किमतीत त्याची विक्री करीत होते.

यवतमाळमध्ये तीन बनावट दारू विक्रेत्यांना अटक; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कमी किमतीच्या डिनेटर स्पिरीटमध्ये ब्लिचिंग पावडर मिसळून बनावट देशी दारू विक्री करणार्या तीघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने यवतमाळ शहरात केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे.
तिघेही बनावट दारू बनवून कमी किमतीत त्याची विक्री करीत होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी धाड टाकली. ही बनावट दारू मानवी आरोग्यास हानिकारक आहे. यात एक रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.