अभियंत्यासह तीन जण ठार

By Admin | Updated: December 17, 2015 02:24 IST2015-12-17T02:24:27+5:302015-12-17T02:24:27+5:30

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. यवतमाळजवळील चापडोह वळणावर दुचाकी ...

Three engineers killed with engineer | अभियंत्यासह तीन जण ठार

अभियंत्यासह तीन जण ठार

दोन अपघात : दिग्रसजवळ आॅटोरिक्षा उलटला, चापडोहोत दुचाकीला व्हॅनची धडक
यवतमाळ/दिग्रस : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. यवतमाळजवळील चापडोह वळणावर दुचाकी अपघातात अभियंता ठार तर दिग्रस तालुक्यातील सिंगदजवळ आॅटोरिक्षा उलटल्याने चालकासह दोन जण मृत्युमुखी पडले.
यवतमाळ-घाटंजी मार्गावर दुचाकीला मारुती व्हॅनने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता मनोज बळीराम मरापे (३५) रा. पार्डी नस्करी ता. घाटंजी हे जागीच ठार झाले. ते बुधवारी सकाळी ९.३० वाजता आपल्या दुचाकीने (एम.एच.२९-एस-१९४) पार्डीनस्करीवरून यवतमाळकडे येत होते. चापडोह वळणावर त्यांच्या दुचाकीला घाटंजीकडे जाणाऱ्या मारुती व्हॅनने (एम.एच.२९-आर-३८५) जबर धडक दिली. यात मनोज दुचाकीवरून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी भास्कर गणपत धुर्वे (रा. वसंतनगर) ता. घाटंजी यांनी तक्रार दाखल केली आहे. घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम मरापे यांचा तो मुलगा होता. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.
दुसरा अपघात दिग्रस-पुसद मार्गावरील सिंगद गावाजवळ मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडला. सुभाष संगीतराव इंगळे (३५) रा. बोरी पुनर्वसन ता. दिग्रस आणि आॅटोरिक्षा चालक फैमोद्दीन शहाबुद्दीन (२५) रा. जांबबाजार ता. पुसद असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहे. हे दोघेही दिग्रसकडून पुसदकडे आॅटोरिक्षाने (एम.एच-२९-डब्ल्यू-९५०३) जात होते. त्या वेळी सिंगद गावाजवळ आॅटोरिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. त्यात दोघेही जागीच ठार झाले.
सुभाषच्या मागे पत्नी, तीन मुले, मुलगी, असा परिवार आहे. तर फैमोद्दीनच्या मागे पत्नी, मुलगा-मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three engineers killed with engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.