शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.

ठळक मुद्देपेरण्या आटोपल्या, पावसाचा पत्ता नाही : साडेसात लाख हेक्टरवरील पिके वाचविण्यासाठी धडपड

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत पाच वर्षातील पावसाचा आराखडा पाहिला तर जूनच्या अखेरीस पावसाला प्रारंभ झाला. मात्र यावर्षी जुनच्या पहिल्याच तारखेला पाऊस बरसला. नंतर पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे पीक वाचविण्यासाठी साडेसात लाख हेक्टरवर धडपड सुरू झाली आहे.जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.जिल्ह्यात पूर्वी ८० टक्के क्षेत्र कापसाचे होते. इतर क्षेत्रात संमिश्र पिके घेतली जात होती. पावसाच्या अनिश्चिततेने या पेरणी क्षेत्रात मोठे फेरबदल झाले आहे. अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये जंगली जनावर आणि रानडुकरांपासून संरक्षण करता येईल असेच पीक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतले आहे.यामुळे जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत चालला आहे. अशातच बोगस बियाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. त्याला पर्यायी पीक नव्याने शोधत आहे.२०१६ ते २०१९ या वर्षात पावसाचे आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. या काळात हवामान खात्याने दरवर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. ऐनवेळी पावसाने उपघडीप दिली. जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. २०१६ मध्ये जूनमध्ये १०९ मिमी पाऊस झाला. हा पाऊस १५ ते २५ जूनच्या सुमारासच बरसला आहे.२०१७ मध्ये १४४ मिमी पावसाची नोंद झाली. मधात काही काळ पावसाचा खंड राहीला. यानंतर पाऊस बरसला. २०१८ मध्ये १५२ मिमी पाऊस झाला. २०१९ मध्ये पावसाचे सर्व गणित बिघडले. सुरूवातीला पाऊस आला. नंतर पाऊसच आला नाही. २५ जूनपर्यंत २१ मिमी पावसाचीच नोंद करण्यात आली. २०२० वर्षामध्ये सर्वात विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. २५ जूनपर्यंत १३४ मिमी पाऊस बरसला.निसर्गाच्या लहरीपणाचाच परिचय पावसाच्या आकडेवारीतून दिसून येतो. कुठल्या वर्षी किती पाऊस प्रारंभीच्या काळात पडेल, याचा नेम राहिला नाही. यातून शेतकऱ्यांच्या पेरणीचे गणित बिघडले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन क रावा लागला आहे.८५ टक्के पेरण्या आटोपल्या सर्वाधिक कपाशीजेमतेम उगविलेली पीक काही भागात दृष्टीस पडत आहेत. कोवळ्या पिकांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यातही कृषी फिडरवर वीज भारनियमन आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. प्रारंभापासून शेतकऱ्यांना या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चार लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आले आहे. दोन लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ९० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. चार हजार हेक्टरवर मूग तर दोन हजार हेक्टरवर उडिदाची पेरणी झाली आहे. सात हजार हेक्टरवर ज्वारी तर २७०० हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. या सर्व पिकांना पावसाची नितांत गरज आहे. मात्र १२ दिवसांपासून पाऊसच गायब आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस