हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:49+5:30

जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.

Thousands of farmers stared at the sky | हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे

हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे

Next
ठळक मुद्देपेरण्या आटोपल्या, पावसाचा पत्ता नाही : साडेसात लाख हेक्टरवरील पिके वाचविण्यासाठी धडपड

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत पाच वर्षातील पावसाचा आराखडा पाहिला तर जूनच्या अखेरीस पावसाला प्रारंभ झाला. मात्र यावर्षी जुनच्या पहिल्याच तारखेला पाऊस बरसला. नंतर पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे पीक वाचविण्यासाठी साडेसात लाख हेक्टरवर धडपड सुरू झाली आहे.
जिल्ह्यात २०१६ ते २०२० या कालखंडातील पावसाचा आराखडा चिंता वाढविणारा आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली आहे. यामुळे हमखास पाऊस बरसणाऱ्या प्रांतावर चिंतेचे ढग दाटले आहेत. पावसाच्या या अनिश्चिततेने पीक लागवडीमध्ये मोठा फेरबदल पहायला मिळत आहे.
जिल्ह्यात पूर्वी ८० टक्के क्षेत्र कापसाचे होते. इतर क्षेत्रात संमिश्र पिके घेतली जात होती. पावसाच्या अनिश्चिततेने या पेरणी क्षेत्रात मोठे फेरबदल झाले आहे. अल्पावधीत हाती येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये जंगली जनावर आणि रानडुकरांपासून संरक्षण करता येईल असेच पीक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी घेतले आहे.
यामुळे जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत चालला आहे. अशातच बोगस बियाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. त्याला पर्यायी पीक नव्याने शोधत आहे.
२०१६ ते २०१९ या वर्षात पावसाचे आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. या काळात हवामान खात्याने दरवर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. ऐनवेळी पावसाने उपघडीप दिली. जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. २०१६ मध्ये जूनमध्ये १०९ मिमी पाऊस झाला. हा पाऊस १५ ते २५ जूनच्या सुमारासच बरसला आहे.
२०१७ मध्ये १४४ मिमी पावसाची नोंद झाली. मधात काही काळ पावसाचा खंड राहीला. यानंतर पाऊस बरसला. २०१८ मध्ये १५२ मिमी पाऊस झाला. २०१९ मध्ये पावसाचे सर्व गणित बिघडले. सुरूवातीला पाऊस आला. नंतर पाऊसच आला नाही. २५ जूनपर्यंत २१ मिमी पावसाचीच नोंद करण्यात आली. २०२० वर्षामध्ये सर्वात विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. २५ जूनपर्यंत १३४ मिमी पाऊस बरसला.
निसर्गाच्या लहरीपणाचाच परिचय पावसाच्या आकडेवारीतून दिसून येतो. कुठल्या वर्षी किती पाऊस प्रारंभीच्या काळात पडेल, याचा नेम राहिला नाही. यातून शेतकऱ्यांच्या पेरणीचे गणित बिघडले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन क रावा लागला आहे.

८५ टक्के पेरण्या आटोपल्या सर्वाधिक कपाशी
जेमतेम उगविलेली पीक काही भागात दृष्टीस पडत आहेत. कोवळ्या पिकांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यातही कृषी फिडरवर वीज भारनियमन आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. प्रारंभापासून शेतकऱ्यांना या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक चार लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आले आहे. दोन लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ९० हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. चार हजार हेक्टरवर मूग तर दोन हजार हेक्टरवर उडिदाची पेरणी झाली आहे. सात हजार हेक्टरवर ज्वारी तर २७०० हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. या सर्व पिकांना पावसाची नितांत गरज आहे. मात्र १२ दिवसांपासून पाऊसच गायब आहे.

Web Title: Thousands of farmers stared at the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.