फुलसावंगीत ठिकठिकाणी विद्युत तारा लोंबकळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:26+5:302021-06-05T04:29:26+5:30
येथील प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये मध्य भागातून महावितरणच्या तारा गेल्या आहे. सज्जाद अहमद यांच्या घरापासून ते मुख्य ...

फुलसावंगीत ठिकठिकाणी विद्युत तारा लोंबकळल्या
येथील प्रभाग क्रमांक ३ व ४ मध्ये मध्य भागातून महावितरणच्या तारा गेल्या आहे. सज्जाद अहमद यांच्या घरापासून ते मुख्य रस्त्यावर तारा अक्षरशः लोंबकळत आहे. या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. या महत्त्वाच्या बाबीकडे महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. गुरूवारी प्रभाग क्रमांक ५ मध्ये ११ केव्हीची जिवंत वीज तार अचानक तुटून पडल्याने विनायक भोजने नामक बालक गंभीर जखमी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला.
ही घटना अतिशय गंभीर असून भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून महावितरणने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ११ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा भर वस्तीतून होतो. अनेकांच्या घरावरून अगदी हाताच्या अंतरावरून तार गेल्या आहे. गावातील इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात तारा लोंबकळल्या आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणने कामे करावी, अशी मागणी होत आहे.