प्रेमनगरात क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते

By Admin | Updated: February 9, 2015 23:22 IST2015-02-09T23:22:12+5:302015-02-09T23:22:12+5:30

शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ‘प्रेमनगर’ परिसरात रविवारी मध्यरात्री क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कारण होते भीषण आगीचे. या आगीत महिलेसह एका चिमुकल्याचा करूण अंत झाला.

There was no haste in love | प्रेमनगरात क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते

प्रेमनगरात क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते

वणी : शहराच्या शेवटच्या टोकाला असलेल्या ‘प्रेमनगर’ परिसरात रविवारी मध्यरात्री क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कारण होते भीषण आगीचे. या आगीत महिलेसह एका चिमुकल्याचा करूण अंत झाला. हृदयाला पाझर फोडणारी ही घटना वणीकरांनाही चटका लावून गेली.
वणी शहरात यात्रा मैदानालगत ‘प्रेमनगर’ नामक वस्ती आहे. या वस्तीत महिलांची राहुटी आहे. रविवारी या वस्तीला मध्यरात्री १.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने जवळपास सात झोपड्यांना आपल्या कवेत घेतले अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. रात्रीच्या काळोखात या वस्तीत एकच आक्रोश होता. बाया, बापडे, चिमुकले आक्रंदन करीत होते. त्यांच्या स्वप्नांची एका रात्रीतच राखरांगोळी झाली होती.
या वस्तीतील चंदाबाई लोणारे यांच्या झोपडीला प्रथम आग लागली. त्या झोपेतून दचकून जाग्या झाल्या. त्यांनी आरडाओरड करताच एकच गलका झाला.
शेजारच्या झोपडीतील बाया, माणसे, चिुमकले झोपडीबाहेर पडले. मात्र सर्वांना जाग्या करणाऱ्या चंदाबाईच आपल्या झोपडीत अडकल्या. त्यांच्यासोबत त्यांचा पाच वर्षीय अजय पेंदोर होता. या आगीत निरागस अजयसह चंदाबाईच्या देहाची जागीच राख झाली.
अजयची आई दोन महिन्यांपूर्वी वारल्याने चंदाबाईने त्याची संपूर्ण जबादारी शिरावर घेतली होती. हे दोघेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. तथापि चंदाबाईने इतर २० ते २५ जणांचा जीव वाचविला.
सोमवारी सर्वत्र याच घटनेची चर्चा होती. सर्व जण मृतक चंदाबाई व अजयसाठी हळहळत होते. त्यांनी आपल्याला जीवनदान दिल्याची कृतज्ञ भावना अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
या आगीचे गूढ उकलण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: There was no haste in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.