शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

आर्णीत पुन्हा अतिक्रमण होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:21 PM

शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली.

ठळक मुद्देनागरिकांची अपेक्षा : पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम जोरात

ऑनलाईन लोकमत आर्णी : शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली. यामुळे शहरातल रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु यापूर्वीचा अनुभव पाहता, काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण होते. त्यामुळे यावेळी तरी रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे मत सर्वसामान्य आर्णीकर व्यक्त करीत आहे.शहरात केवळ एकच मेनरोड असल्याने बाजारपेठ याच रोडवर आहे. त्यामुळे अतिक्रमणसुद्धा मोठ्या प्रमाणात याच रोडवर आहे. पादचारी, सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, तथा म्हातारी माणसे यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी या मेनरोडच्या दोन्ही बाजूच्या सार्वजनिक बांधकाम विभाग च्या हद्दीतील अतिक्रमण मोकळे केल्या जाते, नंतर मात्र परीस्थिती जैसे थे होते. यावेळी मात्र अतिक्रमण काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील तथा नगर परीषदचा सर्विस रोड हासुद्धा प्रथमच मोकळा करण्यात आला.त्यामुळे शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने तथा निवासस्थाने या रोडवर असल्याचे समोर आले, यांना यावेळी सक्तीने हटवण्यात आले आहे. यावेळी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम काय असते, हे सर्वसामान्य लोकांना प्रथमच कळले आहे. या स्तरामधून या मोहिमेचे समर्थन सुद्धा करण्यात येत आहे.नवीन आयएएस अधिकारी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर ही मोहीम यावेळी सक्तीने तथा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. यामुळे आता रस्ते मोकळे झाले आहे. परंतु मोहीम संपल्यानंतर नगर परिषद गप्प राहणार का, पुन्हा अतिक्रमण तर होणार नाही, असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहे.