डिमांड भरूनही वीज जोडणी नाही

By Admin | Updated: January 19, 2017 01:16 IST2017-01-19T01:16:30+5:302017-01-19T01:16:30+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे.

There is no electricity connection even if demand is filled | डिमांड भरूनही वीज जोडणी नाही

डिमांड भरूनही वीज जोडणी नाही

महावितरणचे दुर्लक्ष : वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मनस्ताप
वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे. मात्र वीज जोडणीचे डिमांड नोट भरूनही अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही.
अनेक शेतकरी कार्यालयात उंबरठे झिजवत असूनसुद्धा त्यांना कार्यालयातील कर्मचारी ‘सर्कल झोन’चे नाव सांगून परत पाठवित आहेत. ‘आमच्या कार्यालयात कोणतीही माहिती नाही’, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोअरवेल, शेततळे, विहिरी असून पाण्याचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे या सुविधा कोणत्या कामाच्या, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
दुसरीकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी शेतकऱ्यांना योजनाचे नाव समोर करून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा देखावा करतात. यवतमाळ जिल्ह्याची ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ या नावाने ओळख बनली आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहिर, शेततळे ही योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी शेतात विहिरी, शेततळे खोदले. मात्र पिकांना पाणी देण्यासाठी वीज जोडणी न झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी पावसाने मध्येच दगा दिल्याने खरीपाची पिके वाळू लागली आहे, तर रबी पिकांची वाढ झालीच नाही. यावर्षी कपाशीचे भाव चांगले असले तरी उत्पादनात घट झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतात वीज कनेक्शन मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळून शेतातील पिके वाचवू शकतात. गहू, हरभरा या पिकांच्या उत्पादनातही घट होणार आहे, असा अंदाज काही शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीवर अजुनही वीज कनेक्शन मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. अधिकारी बैठका घेऊन कागदोपत्री मोकळे होतात. परंतु कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा धोरणामुळे अर्ज कार्यालयातच प्रलंबित असतात. शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारून त्रस्त झाले आहे. कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र कंत्राटदार वीज कनेक्शनचे काम केव्हा सुरू करणार की, पावसाळ्याची प्रतीक्षा करणार, असा प्रश्न आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना वीज जोडणी करून देण्यात यावी, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: There is no electricity connection even if demand is filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.