मराठवाडा सीमेवरील तालुक्यात अपुरा पाऊस

By Admin | Updated: August 8, 2015 02:36 IST2015-08-08T02:36:40+5:302015-08-08T02:36:40+5:30

मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळाची छाया उमरखेड आणि महागाव तालुक्यावर दिसत असून, या दोन तालुक्यात पावसाची सरासरी अत्यल्प आहे.

There is insufficient rainfall in the taluka of Marathwada border | मराठवाडा सीमेवरील तालुक्यात अपुरा पाऊस

मराठवाडा सीमेवरील तालुक्यात अपुरा पाऊस

यवतमाळ : मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळाची छाया उमरखेड आणि महागाव तालुक्यावर दिसत असून, या दोन तालुक्यात पावसाची सरासरी अत्यल्प आहे. उमरखेड तालुक्यात वार्षिक सरासरीच्या २३.१७ टक्के तर महागाव तालुक्यात ३५.९९ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरासरी ४४.३३ टक्के पावसाची नोंद आहे.
यावर्षी मराठवाडा भागात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पावसासाठी या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा लागत आहे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना त्याची छाया नांदेड जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दोन तालुक्यांवर पडली आहे. उमरखेड हा तालुका नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असून, मोठ्या प्रमाणात जंगल आणि अभयारण्य असतानाही या तालुक्यात आतापर्यंत केवळ २३.१७ टक्केच पावसाची नोंद झाली. या तालुक्याची वार्षिक सरासरी ९०६.२० मिमी आहे. १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत या तालुक्यात ४९० मिमी पाऊस कोसळणे अपेक्षित आहे. मात्र या कालावधीत केवळ २१० मिमी पाऊस कोसळला.
अशीच स्थिती महागाव तालुक्याचीही आहे. महागाव तालुक्याची वार्षिक सरासरी ५५८.४० मिमी आहे. मात्र या तालुक्यात केवळ ३०९ मिमी पाऊस कोसळला. तो पाऊस वार्षिक सरासरीच्या ३५.९९ टक्के आहे. दरवर्षी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, परंतु यंदा सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असताना या दोन तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: There is insufficient rainfall in the taluka of Marathwada border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.