शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जिल्ह्यात आणखी सव्वाशे फ्लोराईड जलस्रोत वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 9:09 PM

जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते.

ठळक मुद्देभूजलचा अहवाल : पावसाळ्याच्या तोंडावर प्रमाण वाढण्याची भीती

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात एकीकडे पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे उपलब्ध असलेले थोडेथोडके जलस्रोतही दूषित असल्याची गंभीरबाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीतून पुढे आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत ४१६ जलस्रोत फ्लोराईडयुक्त होते. त्यात आणखी १२२ दूषित जलस्रोतांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे नजरेने स्वच्छ दिसणारे पाणी पिण्यासाठी योग्य असेलच याची खात्री नाही. पाण्यात तब्बल १३ प्रकारच्या घातक घटकांचा समावेश असल्याचा गंभीर निष्कर्षही भूजल सर्वेक्षणने स्पष्ट केला आहे.जिल्ह्यातील दोन हजार ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १२ हजार स्रोत आहे. हे पाणी गावकरी दररोज पितात. पिण्यास उपलब्ध असलेले पाणी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तपासले जाते. हे तपासण्याचे काम जलसेवक आणि आरोग्य सेवक पार पाडतात. पावसाळ्यानंतरचा असाच अहवाल जलसुरक्षकांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. या अहवालामध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत वाढल्याचे निदर्शनास आले आहे.यापूर्वी जिल्ह्यात ४१६ पाण्याचे स्रोत फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता ५३८ सोर्स फ्लोराईडचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत १२२ फ्लोराईडयुक्त पाण्याचे सोर्स वाढले आहे. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अधिक खोलवर बोअर करीत असल्याने हा गंभीर प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय आजपर्यंत अनेक सोर्स तपासणीसाठी आरोग्य विभाग आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडे आलेच नाहीत. यामुळे या सोर्सची माहिती अनेकांना मिळाली नाही. फ्लोराईडयुक्त पाण्याने हाडे ठिसूळ होणे, अकाली वृद्धत्व येणे, दात पिवळे पडणे, किडनी खराब होणे, अशा अनेक बाबी प्रकर्षाने जाणवतात. हे सोर्स कायमचे बंद केले जातात. त्याला पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून द्यायचे असतात. यासंदर्भात पाणीपुरवठा विभाग आणि प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येत आहे.भूजल सर्वेक्षणच्या सात प्रयोगशाळाभूजल सर्वेक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची प्रयोगशाळा पाण्याचे नमुने तपासते. यामध्ये सात प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण विभागाच्या आहेत. यामध्ये दारव्हा, पुसद, उमरखेड, राळेगाव, यवतमाळ, पांढरकवडा, वणी आणि जिल्हा आरोग्य विभागाची स्वतंत्र प्रयोगशाळा आहे.सिलिका सर्वाधिक धोकादायककिडनीचा आजार होण्यासाठी केवळ फ्लोराईडच नव्हे तर अनेक बाबीही कारणीभूत असतात. यामध्ये सिलिकाचे प्रमाण पाण्यामध्ये अधिक असल्यास किडनी फेल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. तर नायट्रेट हा घटकही पाण्यामध्ये आढळतो. यामध्ये मल मूत्र आणि रासायनिक खताचे घटक पाण्यामध्ये मिसळतात. यांना बाहेर काढणे अवघड बाब आहे. याकरिता पावसाळ्यापूर्वीच अशा सोर्स जवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातात. यासोबतच पाण्यामध्ये टीडीएसचे (टोटल डिझॉल्व्ह सॉलिडस्- पूर्णत: विरघळलेले क्षार) प्रमाणही आढळते. ५०० ते २००० टीडीएस हा घटक योग्य समजला जातो. यापेक्षा जास्त प्रमाण किडनीला घातक आहे. इतकेच नव्हे तर पाण्यामधील आयर्नचे अधिक राहिले तर किडनीला धोका होऊ शकतो.पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, केवळ स्वच्छ दिसणारे पाणी योग्य आहे असे समजून वापरु नये. याकरिता गावपातळीवर तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.- राजेश सावळेवरिष्ठ भू-वैज्ञानिकभूजल सर्वेक्षण विभाग.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण