रवीनगरमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:44 IST2021-08-23T04:44:25+5:302021-08-23T04:44:25+5:30
कोलार पिंपरी खाणीत कार्यरत रमेश गणपत भगत हे परिवारातसोबत वर्धा जिल्ह्यातील खापरी येथे गेले असता, शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ...

रवीनगरमध्ये चोरी
कोलार पिंपरी खाणीत कार्यरत रमेश गणपत भगत हे परिवारातसोबत वर्धा जिल्ह्यातील खापरी येथे गेले असता, शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी लोखंडी कपाट फोडून सोन्याचे दागिने, कानातील डोरले, मंगळसूत्र, अंगठी व नगदी १२ हजार रुपये, असा ६७ हजारांचा मुदेमाल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा नोदविला. तपासाची दिशा समजून घेण्यासाठी तपासणी तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनखाली जमादार बुरेवार करीत आहेत.
भरधाव प्रवासी ऑटो पलटी, तीन गंभीर
वणी : गणेशपूर वळणावर घोन्साकडून येत असलेल्या विना नंबरच्या भरधाव प्रवासी ऑटोवरचे नियंत्रण सुटले व ऑटो पलटी झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. यात रुखमा मनोहर आत्राम, मनोहर धर्माजी आत्राम, दोघेही रा. सोनेगाव व लक्ष्मी देवीदास शंकरराव, रा. गडचांदूर हे तिघे गंभीर जखमी झाले. या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.