शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा पदभरती उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:46 IST

११९ जणांना मिळणार आदेश : सामान्य प्रशासनाकडून अंतिम यादी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अनुकंपाधारक उमेदवारांना मागील अनेक महिन्यांपासून नोकरीची प्रतीक्षा होती. जिल्हा परिषद प्रशासनाने २०० अनुकंपाधारकांची ज्येष्ठता यादी तयार केली असून, त्यातील ११९ जणांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सामान्य प्रशासन विभागाने अंतिम यादी जाहीर केली आहे.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचे निधन झाले. आधारवड कोसळल्याने अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. दुःखातून सावरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अनुकंपातून नोकरी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्जही करण्यात आले. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेत कधी नोकरी मिळणार याची प्रतीक्षा होती. 

गेल्या वर्षी ९१ जणांना 19 अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले होते. उर्वरित उमेदवारांना नियुक्तीची प्रतीक्षा होती. त्यानंतर २०० जणांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी अनुकंपाधारक उमेदवारांच्या नियुक्तीचा मुद्दा मिशन मोडवर घेतला. दोन दिवसांपूर्वीच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. ज्येष्ठता यादीत शिक्षणानुसार उमेदवारांना पदासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. अनुकंपा पदभरतीत कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियंता (पाणीपुरवठा, बांधकाम विभाग), कनिष्ठ सहायक लेखा, वरिष्ठ सहायक लेखा, आरोग्यसेवक पुरुष ग्रामसेवक आदी पदांचा समावेश आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे याच आठवड्यात अंतिम यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.

खासगीत काम करून सांभाळली जबाबदारी पालक जिल्हा परिषदेत कार्यरत असताना निधन झाल्याने कुटुंबाचा आधारवड कोसळला. यामुळे शिक्षण घेतल्यावर उमेदवारांना अनुकंपा नोकरीची प्रतीक्षा होती; मात्र कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी अनेकांनी खासगी काम करून जबाबदारी सांभाळली. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा काही काळ हा संघर्षाचा राहिला आहे. मात्र, आता सुखाचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

३२ परिचरांना मिळाली पदोन्नती जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या परिचरांच्या पदोन्नतीचा प्रश्न मागील काही वर्षांपासून रखडला होता. ही बाब सीईओ मंदार पत्की यांच्या लक्षात येताच त्यांनी आठ दिवसात पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढला. ३२ परिचरांना कनिष्ठ सहायक म्हणून पदोन्नती देत सोईनुसार पदस्थापनाही दिली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळzpजिल्हा परिषद