शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीला मतदान केंद्रांमुळे मिळाला मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:22 IST

सुविधांवर फोकस : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्चाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मतदान केंद्रांवर कोणत्या प्रकारच्या असुविधांचा सामना करावा लागू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती करण्यात येत आहे. हा निधी १५ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात येणार आहे.

लोकसभेत दोन हजार ५२७ मतदान केंद्र होती. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रात ५१ ने वाढ झाल्याने ही संख्या आता दोन हजार ५७८ वर पोहोचली आहे. ग्रामीण व शहरी भागात जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. या ठिकाणी शाळा दुरुस्ती, पाणी, वीज, रॅम्पचा अभाव आहे. कुठे रॅम्प तुटले आहे. काही शाळांमध्ये शौचालय नादुरुस्त आहे. मतदानासाठी रांगा लागू नये, यासाठी केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या मतदारांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा सामना करावा लागू नये, म्हणून प्रशासनाने सुविधांवर फोकस केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली होती. शौचालय, रॅम्प वॉक दुरुस्ती, वीज, पाणी आदी किरकोळ बाबींवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्रामपातळीवर गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांकडे दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

निवडणुकीत शाळांतील सुविधांच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाल्याने त्याचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला होता विधानसभा निवडणुकीत हा टक्का अधिक वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मतदार जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये, याची काळजी घेण्यात येत आहे.

अशी आहेत मतदान केंद्रे विधानसभा            संख्या वणी                         ३४१ राळेगाव                    ३५० यवतमाळ                  ४२७ दिग्रस                       ३९६ आर्णी                        ३७४ पुसद                        ३४७ उमरखेड                   ३४७

"लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र असलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यात आली होती. या निवडणुकीत शाळांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार शौचालय, रॅम्प वॉक दुरुस्ती करण्यात येत आहे." - प्रकाश मिश्रा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४zp schoolजिल्हा परिषद शाळाYavatmalयवतमाळ