शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आई गेली मजुरीला, शाळाच सांभाळतेय लेकराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांमधील हजारो मजूर कुटुंबे दरवर्षी मुंबईसारख्या ठिकाणी हंगामी रोजगारासाठी जातात. हे मजूर तीन-चार महिने सलग गावाबाहेर राहत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो. यावर उपाय म्हणून शिक्षण विभाग त्या-त्या गावांतील शाळेत ‘हंगामी वसतिगृह’ योजना राबविते. यंदा अशा सहा वसितगृहांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजुरी मिळाली. ही वसतिगृहे २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहेत. तर येत्या ३१ मार्चपर्यंत चालणार आहेत.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. अशावेळी त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो, त्यांच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण होतो. मात्र, शिक्षण विभागाने अशा चिमुकल्यांसाठी सहा हंगामी वसतिगृहे सुरू केली आहेत. या ठिकाणी मुलांना जेवण, नाष्टा अशा सुविधांसह कोरोनाचे नियम पाळून शिक्षणही दिले जात आहे. आई-बाबा मजुरीसाठी परजिल्ह्यांत गेलेल्या लेकरांवर या वसतिगृहांनी मायेची छत्रछाया धरली आहे.विशेषत: पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांमधील हजारो मजूर कुटुंबे दरवर्षी मुंबईसारख्या ठिकाणी हंगामी रोजगारासाठी जातात. हे मजूर तीन-चार महिने सलग गावाबाहेर राहत असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो. यावर उपाय म्हणून शिक्षण विभाग त्या-त्या गावांतील शाळेत ‘हंगामी वसतिगृह’ योजना राबविते. यंदा अशा सहा वसितगृहांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजुरी मिळाली. ही वसतिगृहे २८ डिसेंबरपासून सुरू झाली आहेत. तर येत्या ३१ मार्चपर्यंत चालणार आहेत. हंगामी अनिवासी स्वरुपाच्या वसतिगृहात मुलांना नाष्टा तसेच जेवण दिले जाते. महिन्यातून एकदा त्यांची आरोग्य तपासणीही केली जाते. सध्या या सहा वसतिगृहांमध्ये एकंदर ४७८ मुले लाभ घेत आहेत. संबंधित शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांकडे या वसतिगृहांचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे. मुलांना सुविधा पुरविण्यासाठी येथे प्रतिविद्यार्थी प्रतिदिवस ३२ रुपये ९७ पैसे इतक्या निधीला मंजुरी मिळाली आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या जेवणाची अबाळ झाली होती. मात्र, वसतिगृहांमुळे आता मुलांना पोटभर जेवण मिळू लागल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी दिली.

यंदा स्थलांतर घटलेदरवर्षी महागाव, पुसद, उमरखेड, दिग्रस या तालुक्यातील हजारो मजूर ऊसतोडीच्या कामासाठी, वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतर करतात. मात्र, यंदा स्थलांतराचे प्रमाण घटले आहे. कोरोनाच्या संकटात मुंबई, औरंगाबादसारख्या शहरातून खेड्यात परतलेले मजूर पुन्हा गाव सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. गावातच मिळेल ते काम करण्याची मानसिक तयारी अनेकांनी केली आहे. त्यामुळे यंदा केवळ सहा हंगामी वसतिगृहांची गरज निर्माण झाली. दिग्रस तालुक्यात तर एकाही वसतिगृहाचा प्रस्ताव आला नाही.

हंगामी वसतिगृहांवर शिक्षण विभागाचा ‘वाॅच’हंगामी वसतिगृहांचा दररोज तालुका आणि जिल्हास्तरावरून शिक्षण विभाग आढावा घेत आहे. किती मुले वसतिगृहात आली, किती जणांना जेवण दिले गेले आदींचा अहवाल रोजच्या रोज घेतला जात आहे. त्यासाठी प्रत्येक मूल जेवण करतानाचा फोटो ऑनलाईन पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, वसतिगृह सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्याध्यापकांना यवतमाळात बोलावून व्यवस्थापनाबाबत तसेच लेखाविषयक प्रशिक्षण देण्यात आले.  

टॅग्स :Schoolशाळा