शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या मार्गात केंद्राची आडकाठी; विद्यार्थ्याचं होतंय नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 06:40 IST

आता १३ ऑक्टोबरला सुनावणी : म्हणे, महाडीबीटी प्रणालीत बदल करा

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : उच्च शिक्षणासाठी मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे केंद्र सरकारच्या हेकेखोरीने दाेन वर्षांपासून काेर्टाच्या ट्रेझरीत अडकले आहेत. या प्रकरणात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने शुक्रवारी महाडीबीटी वरून केंद्राची रक्कमही टाकण्याबाबत ‘कन्सेंट लेटर’ सादर केले. मात्र, केंद्राने महाडीबीटीतच बदल करावे लागतील, अशी भूमिका घेतली. आता दोन्ही बाजूंचे ॲफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे शिष्यवृत्ती पुन्हा लांबणीवर पडली आहे. 

महाविद्यालयांची गोचीnशिष्यवृत्तीची रक्कम व त्यातून फी न मिळाल्याने राज्यातील १५ हजार महाविद्यालयांचा कारभार अडचणीत आला. त्यामुळे ९६ संस्थाचालकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकारच्या हिश्श्याची रक्कमही दिली जावी, अशी मागणी याचिकेत केली गेली. nउच्च न्यायालयाने संस्थाचालक यांच्या बाजूने निकाल दिल्यावर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. 

१५७८ कोटी रुपये अडकले१३ ऑक्टोबरला या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या हिश्श्याचे ४० टक्के पैसे द्वारे देते. परंतु, केंद्र सरकार आपल्या हिश्श्याची ६० टक्के रक्कम अदा करण्यासाठी ‘ नॅशनल स्काॅलरशिप ’ पोर्टलचा वापर करते. या वादात २०२०-२१ या सत्रापासूनच शिष्यवृत्तीचे सुमारे १५७८ कोटी रुपये अडकले आहेत.

१३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला औरंगाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राज्य सरकारप्रमाणे शिष्यवृत्ती अदा करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी महाडीबीटी वरील डेटा केंद्राला उपलब्ध करून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी २९ सप्टेंबर रोजी हा डेटा देण्याबाबत व महाडीबीटी वापरण्याबाबत राज्य सरकारचे ‘ कन्सेंट लेटर ’ न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र, हे पत्र केंद्राने धुडकावून लावले. आता १३ ऑक्टोबरच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती