शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

ठाणेदार साहेब, तुम्ही गुन्हेगारांना चोप देता का हो ?

By admin | Updated: January 10, 2015 02:09 IST

ठाणेदार साहेब, तुम्ही गुन्हेगारांना खरच चोप देता का ? ‘बाजीराव काय असते बरं’? गुंड-गुन्हेगारांना पकडताना तुम्हाला भीती वाटत नाही का ? काका तुम्ही कोणताच सण-उत्सव साजरा करीत नाही का ?

सुनील हिरास दिग्रसठाणेदार साहेब, तुम्ही गुन्हेगारांना खरच चोप देता का ? ‘बाजीराव काय असते बरं’? गुंड-गुन्हेगारांना पकडताना तुम्हाला भीती वाटत नाही का ? काका तुम्ही कोणताच सण-उत्सव साजरा करीत नाही का ? तुमची मुलं, तुमच्या मागे लागत नाही का? असे एक ना अनेक प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांनी पोलिसांना भंडावून सोडले. दिग्रस येथील अंजुमन उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करून चक्क पोलिसांचीच दांडी उडविली. मात्र पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक प्रकाश राऊत, वनदेव कापडे आदींनी चेहऱ्यावर हास्य फुलवित तेवढ्याच संयमाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. काका तुम्ही कोणता सण-उत्सव साजरा करताना दिसत नाही. मग तुमची मुलं-बाळ यात्रा, उत्सवात घेऊन जाण्याचा हट्ट धरत नाही का असा प्रश्न केला. तेव्हा ठाण्यातील वातावरण धीरगंभीर झाले. तुमच्या सारखे चिमुकले उद्याचे आदर्श नागरिक बनतील, गुन्हेगारी कमी होईल, तेव्हा आम्ही सण-उत्सव साजरा करू असे उत्तर पोलिसांनी दिले. रायझिंग डे निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी एजाजोद्दीन होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष हगवणे, शेख मोहसीन, शैलेश ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश दंदे, दीपक कांकेटवार, पवन गोरे, गजानन पत्रे, संदीप ठाकूर, प्राचार्य मकसुद अहमद, हसीम खान, गाजी देशमुख, मसूद खान, मोहंमद हारुण, सुफी देशमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याचा कसा कारभार चालतो हे जवळून अनुभवले. यावेळी नोंदणी कक्ष, ठाणेदाराचा कक्ष, बिनतारी संदेश विभाग, गोपनीय अहवाल, लॉकअप, गुन्हे विभाग आदींची विस्तृत माहिती घेतली. यावेळी थ्री नॉट थ्री, एसएलआर, गॅस गन, अश्रुधुरांच्या नळकांड्या, ढाली, गोळ्या, पिस्तुल आदी विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिल्या. ही शस्त्रे विद्यार्थ्यांनी हातून घेऊन निरीक्षण केले. यावेळी अंमलदार शरद येडतकर, नारायण पवार, शेख मोहसीन उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांनी हात मिळवून ठाणेदारांचे अ‍ॅटोग्राफ घेतले. विद्यार्थी बराच वेळ पोलीस ठाण्याच्या आवारात रमले. जणू आपल्या शाळेचा वर्गच सुरू आहे की काय अशा आवेशात आणि कुतुहलाने विद्यार्थी पोलीस ठाण्यात वावरताना दिसत होते. सर्वांचे चेहरे हास्याने प्रफुल्लित झाले होते. तर आपण आज पोलीस ठाणे पाहून जग जिंकू२२न टाकले या अविरभावात पोलीस ठाण्याचा निरोप घेतला. कार्यक्रमाला मजहर अहमद खान, सुहेल जावेद यांच्यासह अंजुमन उर्दू विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.