‘जेडीआयईटी’मध्ये टेक्सटाईल डे
By Admin | Updated: September 11, 2016 01:00 IST2016-09-11T01:00:32+5:302016-09-11T01:00:32+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबद्वारा टेक्सटाईल डे उत्साहात साजरा करण्यात आला.

‘जेडीआयईटी’मध्ये टेक्सटाईल डे
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील ‘टेसा’ क्लबद्वारा टेक्सटाईल डे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त टेक्सटाईल उद्योगांमध्ये नवीन घडामोडी, तंत्रज्ञानाचा विकास तसेच नोकरी व व्यवसायाच्या संधीबाबत टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान गारमेंट व पोस्टर प्रदर्शनाचे दालन खुले करण्यात आले.
माँ सरस्वती, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, टेक्सटाईल विभाग प्रमखु प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, देव्यानी धांदे, दीपाली राठोड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातून गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेले तसेच नामांकित कंपनीत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. यामध्ये प्रवीण दीक्षित, संदीप शुक्ला, वैष्णवी इंगलेकर, ऋतुजा भोरे, देव्यानी धांदे, दीपाली राठोड, लीना फुंडे, धनश्री तल्लन आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नजा राऊत, तर आभार सागर साळुंके यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्रा. दीपक उबरहांडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख प्रा. राहुल फाळके, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम अवझाडे, उमेश पाटील, अंकित डेरे, तेजल कापसे, युगा बोबडे, सायली देव, क्षितिज झळके, दीपाली मुंडलीक, अंजली सिंगनजुळे, वर्षा राठोड, हर्षल सम्रित, मृणाल डहाके, सपना घुगरे, मेहरा फाळके, विशाल सावनकर आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)