शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

माजी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील प्रश्नांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 23:33 IST

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली.

ठळक मुद्देकाँग्रेसने संधी सोडली : टिटवीतील शेतकरी आत्महत्या, वाघाचे हल्ले, फवारणीतून विषबाधा

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली. वास्तविक हे विषय काँग्रेसला राष्टÑीय-राज्य स्तरावर गाजविता आले असते. परंतु काँग्रेसने ही नामीसंधी सोडली.कर्ज व नापिकीपायी होणाºया शेतकरी आत्महत्यांमुळे दुर्गम, आदिवासी बहुल यवतमाळ जिल्हा जगभर चर्चेत आला आहे. केंद्र व राज्यात सत्ता बदल होऊनही शेतकºयांच्या या आत्महत्या थांबविता आल्या नाहीत किंवा नियंत्रणातही आणता आलेल्या नाहीत. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे भाजपाचे ‘मिशन’ राज्यातच नव्हेतर जिल्ह्यातसुध्दा फेल ठरले. उलट ज्या आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावातून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात देशभरातील शेतकºयांशी ‘चाय पे चर्चा’च्या निमित्ताने संवाद साधला, त्याच मतदारसंघातील टिटवी (ता. घाटंजी) गावात शेतकºयाने मोदींच्या नावाने शिमगा करीत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या शेतकºयाने झाडाच्या पानावर ‘मोदी सरकार, शेतकरी आत्महत्या’ असे लिहिले. थेट पंतप्रधानांचा नामोल्लेख करून आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे हे प्रकरण काँग्रेसला राष्टÑीय मुद्दा बनविता आले असते. काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी टिटवी गावात तातडीने भेटी देऊन हा मुद्दा कॅश करणे अपेक्षित होते. परंतु दिल्लीचे तर दूर राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य प्रमुख नेतेही या टिटवी गावाकडे फिरकले नाहीत.आदिवासी गावे भयभीतटिटवीतील शेतकरी आत्महत्येशिवाय वाघाचा मानवी वस्त्यांमधील धुमाकूळ, शेतकरी-शेतमजूरांच्या शिकारी, पिकांवर कीटकनाशक फवारताना सहा जणांचा गेलेला बळी, सुमारे २०० शेतकरी-शेतमजुरांना झालेली लागण, त्यामुळे दृष्टी जाण्याचे, मेंदूवर परिणाम होण्याचे घडलेले प्रकार हे मुद्देही गाजत आहेत. वाघ माणसांची, जनावरांची शिकार करतो. मात्र वन विभागाला तो सापडत नाही. त्यामुळेच एसडीओंचे वाहन पेटवून रोष व्यक्त केला गेला. वाघाने पांढरकवडा विभागात आतापर्यंत सहा बळी घेतले. शेतकºयांची जनावरे फस्त केली. त्यामुळे आदिवासी गावे भयभित झाली आहे. या गावातील आदिवासी बांधवांना जणू वाघानेच क्षेत्रबंधनात अडकविल्याचे चित्र आहे.शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जीविताशी संबंधित विषय गाजत असताना राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना त्या गावात भेटी देण्याची, हाकेच्या अंतरावरील शासकीय रुग्णालयात जाऊन विषबाधा झालेल्या शेतकºयांची भेट घेण्याची तसदी घ्यावी वाटली नाही. या उलट सत्तेत असूनही भाजपाचे खासदार नाना पटोले पक्षाशी पंगा घेऊन भंडाºयाहून थेट टिटवीत पोहोचले. यावरून शेतकरी व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस (सत्ता जाऊन साडेतीन वर्षे झाल्यानंतरही) खरोखरच किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.स्थानिक नेत्यांकडील भेटीला दिले अधिक महत्वमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने रविवार २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येऊन गेले. किमान ते तरी टिटवी गावाला भेट देतील, अशी अपेक्षा येथील पक्ष कार्यकर्ते आणि भाजपा सरकारला वैतागलेले शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी निराशा केली. स्थानिक नेत्यांकडील भेटी त्यांना अधिक महत्वाच्या वाटल्या. पुसद व यवतमाळातील ईनडोअर कार्यक्रमात हजेरीचा सोपस्कार आटोपून पृथ्वीराज चव्हाण रवाना झाले. त्यांच्या लेखी जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित राहिले. एकतर या प्रश्नांबाबत स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना अंधारात ठेवले असावे किंवा हे प्रश्न पक्षाला कॅश करुन देण्याची त्यांची इच्छाशक्ती नसावी, असे दिसते. टिटवीतील टळलेल्या या सांत्वन भेटीसाठी दोष कुणाचा ? स्थानिक नेत्यांचा की खुद्द माजी मुख्यमंत्र्यांचा हा विषय काँग्रेससाठी चिंतनाचा आहे.