जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टेक्स क्विज’
By Admin | Updated: August 26, 2015 02:44 IST2015-08-26T02:44:54+5:302015-08-26T02:44:54+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील स्टुडंट असोसिएशन (टेसा) तर्फे टेक्स क्विज स्पर्धा घेण्यात आली.

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टेक्स क्विज’
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील स्टुडंट असोसिएशन (टेसा) तर्फे टेक्स क्विज स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता या विषयावर झाली. यातून १२ विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. अंतिम फेरीत सामान्यज्ञान व टेक्सटाईल इंजिनिअरिंग विषयावर घेण्यात आली. यात पूजा महल्ले, सागर धोटे, हर्षल सम्रीत या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी वस्त्रोद्योग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा.संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, ‘टेसा’ समन्वयक प्रा.प्रशांत रहांगडाले, प्रा. सुजीत गुल्हाने, प्रा.योगेश वानेरे, प्रा. दीपक उबरहांडे, प्रा. मोनाली इंगोले उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रितम रामटेके, विनय चवरे, ‘टेसा’चे विद्यार्थी प्रतिनिधी विक्रमजित सिंग, बिपीन पांडे, गजानन कदम, दीपाली राठोड, सुरभी परळीकर, अंकित डेरे, युगा बोबडे, तृप्ती पाठक, नगमा खान, श्याम शंदूरकर आदींनी पुढाकार घेतला. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)