विनाकारण फिरणाऱ्यांची श्रीरामपूर येथे चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:56+5:302021-05-09T04:42:56+5:30

पुसद : तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असताना शहरात विनाकारण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ...

Testing of unruly travelers at Shrirampur | विनाकारण फिरणाऱ्यांची श्रीरामपूर येथे चाचणी

विनाकारण फिरणाऱ्यांची श्रीरामपूर येथे चाचणी

googlenewsNext

पुसद : तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असताना शहरात विनाकारण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आता श्रीरामपूर येथे ‘ऑन द स्पाॅट’ चाचणी सुरू केली आहे.

कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विनाकारण फिरणारे नागरिक व दुचाकीधारकांची आता ‘ऑन द स्पॉट’ कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सकाळपासूनच आरोग्य विभाग, पोलीस, नगरपालिका व महसूल प्रशासनाने कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या व शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांसह दुचाकी व चारचाकीधारकांची कोविड चाचणी सुरू केली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांच्या नेतृत्वात आशा स्वयंसेविकादेखील रस्त्यावर उतरून चाचणी करीत आहेत. शहरातील वाशिम रोड, दिग्रस रोड, माहूर रोड, उमरखेड रोड व श्रीरामपूर येथे शेकडोंच्या संख्येत कोरोना चाचणी करण्यात आली. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकीधारकांमध्ये धडकी भरली आहे.

Web Title: Testing of unruly travelers at Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.