जेडीआयईटीमध्ये ‘टेसा’चे पुनर्गठन

By Admin | Updated: May 15, 2017 01:15 IST2017-05-15T01:15:28+5:302017-05-15T01:15:28+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी

Tessa's reorganization in JediT | जेडीआयईटीमध्ये ‘टेसा’चे पुनर्गठन

जेडीआयईटीमध्ये ‘टेसा’चे पुनर्गठन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी टेक्सटाईल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनची (टेसा) कार्यकारिणी गठित करण्यात आली. तसेच २०१६-१७ च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी मंचावर टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, ‘टेसा’ समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. राम सावंत आदी उपस्थित होते.
माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभियांत्रिकी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यादृष्टीने तसेच त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी ‘टेसा’ची स्थापना २६ जानेवारी १९९९ रोजी करण्यात आली होती.
‘टेसा’च्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष हर्षल सम्रित, उपाध्यक्ष मृणाल डहाके, अभिलाष लांजेवार, सचिव वैभव पद्मशाली, सहसचिव प्रियंका लोखंडे, समीक्षा देवगडे यांचा समावेश आहे. मावळते अध्यक्ष सागर साळुंके, उपाध्यक्ष युगा बोबडे, तेजस कापसे, सचिव तृप्ती पाठक आदी होते.
२०१६-१७ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीद्वारे निवड झाली. यात तेजस कापसे, प्रणय ढगे, प्रणव बुराडे, लोमेश नारखेडे, सागर साळुंके, अंकित डेरे, शुभम अवझाडे, सायली देव यांचा समावेश आहे. त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात टेक्स्ट क्विझ स्पर्धा घेण्यात आली. यात प्रयय ढगे, स्वप्नजा राऊत, कुणाल जोतवाणी यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. उमेश पाटील, दीपाली मुंडलीक, विशाल सावंकार हा गट उपविजेता ठरला. मानचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन स्वप्नजा राऊत, मनिष सिंग यांनी, तर आभार हर्षल सम्रित यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्याम केळकर, अमोल गुल्हाने, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी नितेश धैर्या, मृणाल डहाके, अभिलाष लांजेवार, प्रियंका लोखंडे, चेतन वारंबे, समीक्षा देवगडे, वैभव पद्मशाली, अ‍ॅना सिरम, नीलिमा खाडे, प्रतीक्षा वनकर, कुणाल जोतवाणी, विशाल सावंकार, भूमिका भलमे, पूनम लढ्ढा, पूजा मेसारे, रंजना साबळे, वैष्णवी कुबडे, मोनिका नालबोगा, पूनम आंबेकर, मयूर महिंद्रकर, रूचा डहाके आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Web Title: Tessa's reorganization in JediT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.