‘जेडीआयईटी’त ‘टेसा’ची कार्यकारिणी

By Admin | Updated: April 27, 2015 02:05 IST2015-04-27T02:05:34+5:302015-04-27T02:05:34+5:30

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग

'Tessa' executive in JDIET | ‘जेडीआयईटी’त ‘टेसा’ची कार्यकारिणी

‘जेडीआयईटी’त ‘टेसा’ची कार्यकारिणी

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे २०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी टेक्सटाईल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (टेसा)ची कार्यकारिणी गठित करण्यात आली. तसेच २०१४-१५ या शैक्षणिक सत्रातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रसंगी मंचावर टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, ‘टेसा’ समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, समन्वयक प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. दीपक उबरहंडे, प्रा. योगेश वानेरे, प्रा. मोनाली इंगोले आदी उपस्थित होते.
‘टेसा’तर्फे मागील सत्रात घेण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमाविषयीची माहिती यावेळी देण्यात आली. टेक्सटाईल क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर असलेल्या संधीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. परिसर मुलाखतीतून आरएसजे इन्स्पेक्शन सर्वीसेस प्रा.लि. या बहुराष्ट्रीय टेक्सटाईल कंपनीत निवड झाल्याबद्दल सुमित यादव या विद्यार्थ्याचा प्रा. गणेश काकड यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. संचालन सुरभी परळीकर तर आभार बिक्रमजीत सिंग यांनी मानले.
कार्यक्रमासाठी अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, विद्यार्थी प्रतिनिधी अश्विन उके, दीपाली नागतोडे, प्रियंका सानप, अंकिता गावंडे, जुबेर खान पठाण, पूजा महल्ले, नगमा खान, उमेश पाटील, ऋतुजा भोरे, धनश्री तल्लन, भूमिका भलमे, सायली देव, शुभम अवझाडे, कल्याणी जुळे, नाहीद शेख, युगा बोबडे, महेंद्र फाळके आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)

Web Title: 'Tessa' executive in JDIET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.