रात्रीच्या अंधारात कार-दुचाकीची भीषण धडक; एक ठार, कार चालक फरार
By अविनाश साबापुरे | Updated: June 26, 2023 23:29 IST2023-06-26T23:28:50+5:302023-06-26T23:29:35+5:30
भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झाला.

रात्रीच्या अंधारात कार-दुचाकीची भीषण धडक; एक ठार, कार चालक फरार
महागाव (यवतमाळ) : भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झाला. तर कार चालक फरार झाला आहे. हा भीषण अपघात महागाव तालुक्यातील शिरपूर येथे वळण रस्त्यावर सोमवारी रात्री १० वाजता झाला.
कार (आय ट्वेन्टी क्रमांक एम.एच.२९ एआर ५८३९) पुसदवरून माहूरच्या दिशेने शिरपूर मार्गे महागाव येत होती. तर मोटरसायकलवर (बुलेट क्रमांक २३ बिएच २३२०) दोघे जण शिरपूरवरून गुंजकडे जात होते. शिरपूर गावाजवळ शिप नदीवरील पुलावर वळण घेत असताना या वाहनांची धडक झाली.
मोटरसायकलवरील शुभम यादव (वय २६ वर्ष, राहणार गुंज) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमोद मगर ( वय ३६, राहणार किनवट) हे गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर पुसद येथे उपचार सुरू असल्याची माहिती गुंज येथील प्रतिष्ठित नागरिक प्रमोद जाधव यांनी दिली.आय ट्वेंटी कार ही महागाव येथील भंगार व्यावसायिक यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे.