दीडशे विद्यार्थ्यांंची शस्त्रक्रिया अडकली कागदपत्रांच्या अटीत

By Admin | Updated: May 17, 2014 00:32 IST2014-05-17T00:32:17+5:302014-05-17T00:32:17+5:30

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रियेसाठी विविध प्रकारचे कागदपत्र मागितले जात आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विलंब होत असल्याने जिल्ह्यातील

In the terms of the documents stuck in one hundred students' stutter | दीडशे विद्यार्थ्यांंची शस्त्रक्रिया अडकली कागदपत्रांच्या अटीत

दीडशे विद्यार्थ्यांंची शस्त्रक्रिया अडकली कागदपत्रांच्या अटीत

यवतमाळ : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रियेसाठी विविध प्रकारचे कागदपत्र मागितले जात आहे. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विलंब होत असल्याने जिल्ह्यातील जवळपास १५0 विद्यार्थी हृदयशस्त्रक्रियेपासून वंचित आहेत.

यापूर्वी सदर योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांंवर शस्त्रक्रियेसाठी केवळ शाळेच्या कार्डाची आणि प्रमाणपत्राची गरज भासत होती. आता मात्र यासाठी विविध प्रकारचे कागदपत्र मागविले जात आहे. काही रुग्ण शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात गेले असता त्यांना उपचाराची र्मयादा ६0 ते ७0 हजार रुपये सांगण्यात आली. याशिवाय विविध कागदपत्र मागविण्यात आले. यामुळेच शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या वाढत आहे.

सदर योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळेचे ओळखपत्र आणि प्रमाणपत्राच्या आधारे मिळावा, योजनेतील पथकासाठी आवश्यक प्रथमोपचार औषधी आणि साहित्य तत्काळ उपलब्ध करून द्यावे, महागाव कसबा येथील रोशनी इस्माईल खाँ पठाण या अकरावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या कुटुंबाला तत्काळ मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. योजना राबविण्यासाठी शासनाकडून चांगले प्रयत्न होत असले तरी केवळ कागदपत्रांची पूर्तता करण्यास अनेक अडचणी येत आहेत. बरेच दिवसपर्यंंत आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध होत नाही. अशावेळी रुग्ण विद्यार्थ्याची प्रकृती खालावत जावून जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: In the terms of the documents stuck in one hundred students' stutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.