शेंदूरजनाघाट येथे तणाव
By Admin | Updated: June 29, 2015 00:35 IST2015-06-29T00:35:23+5:302015-06-29T00:35:23+5:30
जनावरे कत्तलखान्यात नेताना काही युवकांनी पोलिसांना माहिती दिली.

शेंदूरजनाघाट येथे तणाव
दोघे जखमी : सहा जणांविरुद्ध गुन्हे, जनावरे अवैध वाहतुकीचे निमित्त
शेंदूरजनाघाट : जनावरे कत्तलखान्यात नेताना काही युवकांनी पोलिसांना माहिती दिली. याच कारणामुळे परिसरात दोन गट समोरासमोर आल्याने तणावसदृश स्थिती निर्माण झाली. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान घडली. घटनेमुळे परिसरातील बाजारपेठ बंद झाली. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हे दाखल केले असून आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी जखमी झालेल्या दोन व्यक्तींना नागपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. रविवारीसुध्दा शहरात तणावपूर्ण शांतता होती.
पोलीस सूत्रानुसार, २७ जून रोजी रात्री साडेनऊ वाजताच्यादरम्यान वाई मार्गाने शेंदूरजनाघाट येथे काही इसम गाई तसेच अन्य जनावरांची पायी वाहतूक करीत होते. सदर गुरे कत्तलखान्यात जात असल्याचा संशय काही तरुणांना आल्याने ते थेट पोलिसांना माहिती देण्यास गेले. त्यामुळे गुरे हाकणाऱ्या इसमांनी तक्रारकर्त्या युवकांना लाठीकाठीने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. जखमींमध्ये अमोल परसराम कडू (२९), अमोल धनराज बोके (२२, दोन्ही, रा.शेंदूरजनाघाट) यांचा समावेश आहे.