शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

पेन्शन योजनेचे जिल्हा परिषदेला आले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे पेन्शनचे फायदे या कर्मचाऱ्यांनी गमावले आहेत. दरम्यान, शासनाने त्यांच्यासाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना  (डीसीपीएस) अमलात आणली. पण, त्यात काहीही लाभ मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. विशेष म्हणजे, आता डीसीपीएस योजेनेचे खातेही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (एनपीएस) वर्ग करण्याचे आदेश आहेत.

ठळक मुद्देफाॅर्म भरण्यासाठी दबाव : आधी एनपीएस समजावून सांगा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जुनी पेन्शन योजना तर गेलीच, पण आता कुचकामी नवी पेन्शन योजना लादण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जातोय, अशी ओरड कर्मचाऱ्यांमधून होत आहे. एनपीएस योजनेचे संमतीपत्र भरून घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर पुण्यातून दबाव वाढतोय. तर ही योजनाच आमच्या कामाची नसताना आम्ही संमतीपत्र का भरून द्यावे, असा सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहेत. या खेचाखेचीत जिल्हा परिषदेत जुन्या पेन्शनवरून नवे टेन्शन वाढले आहे. सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे पेन्शनचे फायदे या कर्मचाऱ्यांनी गमावले आहेत. दरम्यान, शासनाने त्यांच्यासाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना  (डीसीपीएस) अमलात आणली. पण, त्यात काहीही लाभ मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आहे. विशेष म्हणजे, आता डीसीपीएस योजेनेचे खातेही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (एनपीएस) वर्ग करण्याचे आदेश आहेत. मात्र, त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून संमतीपत्र (सीएसआरएफ फाॅर्म) भरून घेणे बंधनकारक आहे. हा फाॅर्म भरून घेण्याची मुदतही आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण, कर्मचारी काही संमतीपत्र देण्यासाठी राजी नाहीत. विशेषत: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी वेगळेच आंदोलन छेडले आहे. या संघटनेने स्वत:च एक अर्ज तयार केला आहे. आधी आम्हाला एनपीएसचे फायदे - तोटे समजावून सांगा, या योजनेचा आजवर किती जणांना लाभ मिळाला, ते स्पष्ट करा, त्यानंतर समाधान झाले तरच आम्ही संमतीपत्र भरून देऊ, अशी लेखी मागणी करणारा हा अर्ज हजारो कर्मचाऱ्यांनी आपापल्या पंचायत समिती स्तरावर प्रशासनाला सोपविला आहे. आश्चर्य म्हणजे, एकाही पंचायत समितीने या अर्जाचे उत्तर कर्मचाऱ्यांना दिलेले नाही. तर उलट, संमतीपत्र भरून दिले नाही, तर पगाराला विलंब होईल, अशी धमकीवजा सूचना दिली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना, नवीन अंशदायी पेन्शन योजना आणि आता एनपीएस योजनेचे खाते उघडणे ही प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनासाठी नवी डोकेदुखी ठरत आहे, तर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी ही निकराची लढाई ठरत आहे. 

शिक्षक म्हणतात, शासन आदेश दाखवा !एनपीएसचे खाते उघडण्यासाठी विविध विभागांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानंतरच त्या-त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र मागण्यात आले. मात्र, शालेय शिक्षण विभागाने अद्याप असा कुठलाही आदेश निर्गमित केलेला नाही. तरीही शिक्षण विभागाचे अधिकारी केवळ वित्त विभाग व ग्रामविकासच्या जीआरचा आधार घेऊन शिक्षकांवर संमतीपत्रासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप, जुनी पेन्शन हक्क संघटनेने केला. याबाबत शुक्रवारी शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन आधी शिक्षण विभागाचा जीआर दाखवा, अशी मागणीही करण्यात आली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदPensionनिवृत्ती वेतन